Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Firecracker Rules: वेळीच सावध व्हा! रस्त्यावर फटाके फोडाल तर होणार कारवाई, विदेशी फटाक्यांच्या विक्रीलाही मनाई, जाणून घ्या

Diwali Firecracker Rules: येत्या काही दिवसात दिवाळी सण येतो. दिवाळी सण म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती आकाशात होणारी रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांचा झगमगाट आणि सर्वत्र पसरलेला आनंदाचा माहोल. मात्र यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्पुरत्या फटाके विक्रीसह फटाके फोडण्याबाबत नियमावली जारी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 24, 2026 | 11:33 AM
वेळीच सावध व्हा! रस्त्यावर फटाके फोडाल तर होणार कारवाई, विदेशी फटाक्यांच्या विक्रीलाही मनाई, जाणून घ्या नियम (फोटो सौजन्य-ChatGPT)

वेळीच सावध व्हा! रस्त्यावर फटाके फोडाल तर होणार कारवाई, विदेशी फटाक्यांच्या विक्रीलाही मनाई, जाणून घ्या नियम (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीत फटाके फोडताना सावधान!
  • नियम मोडल्यास दाखल होऊ शकतो गुन्हा
  • रात्री १० नंतर आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी
Diwali Firecracker Rules: दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी सणाला देशभरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. अनेक ठिकाणी फटाक्यांची दुकाणे लागायला सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी पोलिसांचे काही नियम फॉलो करावे लागणार आहे.दिवाळी सणाच्या काळात फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी पोलीस प्रशासनासह पर्यावरण यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. याचदरम्यान फोडणे आणि तात्पुरत्या फटाके विक्रीसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर, पदपथांवर तसेच गल्लीबोळांत फटाके फोडण्यास निर्बंध लागू करण्यात आले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि मुंबई महापालिकेने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai Highcourt) निर्देशांनुसार फटाक्यांच्या वापरावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

दिवाळीपूर्वी महाबळेश्वरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू; टपऱ्या-हातगाड्यांवर पालिकेचा धडाका, मुख्य बाजारपेठेकडील रस्ता मोकळा

– रस्ते आणि पदपथ: रस्ते, पदपथ, गल्ली तसेच रस्त्यापासून १० मीटरच्या आत फटाके फोडण्यास मनाई असल्याचे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.

– रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था: रुग्णालये, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये आणि न्यायालयांपासून १०० मीटरच्या परिसरात फटाके फोडण्यास बंदी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

– रात्रीच्या वेळेतील निर्बंध: रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी लागू राहणार आहे.

– मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रम: सण आणि मिरवणुकांमध्ये लेझर, तीव्र प्रकाशाचे दिवे आणि बीम लाइट्स वापरण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी फटाके फोडण्यापूर्वी लागू असलेल्या स्थानिक नियमांची माहिती घ्यावी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक अंतर राखावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

नियमभंग केल्यास कोणत्या कायद्यांनुसार कारवाई?

फटाक्यांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी कार्यक्रमांमध्ये ध्वनीची पातळी मोजणारी उपकरणे बंधनकारक करण्यावर भर देण्यात आला आहे. खासगी ठिकाणी आयोजित कार्यक्रमांनाही निर्धारित ध्वनीमर्यादांचे पालन करावे लागणार आहे. नागरिकांनी निर्धारित वेळेत कमी प्रदूषण करणाऱ्या ग्रीन फटाक्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नियमांचे उल्लंघन झाल्यास ध्वनीप्रदूषण नियंत्रण, पर्यावरण संरक्षण, फौजदारी कायदे आणि स्फोटक पदार्थांशी संबंधित कायद्यांनुसार कारवाई होऊ शकते. तसेच नियमभंगाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी MPCB च्या ‘महा पर्यावरण’ ॲपचा वापर करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, ग्रीन फटाक्यांमध्येही विषारी जड धातू आढळल्याचा दावा आवाज फाउंडेशनने केला आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी या संस्थेकडून करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाची प्रशासनावर नाराजी

फटाक्यांवरील निर्बंधांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनावर नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. निर्बंधांची माहिती नसल्याचे काही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्याची नोंदही न्यायालयाने घेतली आहे. या प्रकरणी २६ ऑक्टोबर रोजी मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस प्रमुखांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

तात्पुरत्या फटाके विक्रीचे परवाने कधी मिळणार?

दिवाळीनिमित्त तात्पुरत्या फटाके विक्रीसाठी ६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी परवाने दिले जाणार आहेत. परवान्याची मुदत संपल्यानंतर विक्रेत्यांना फटाक्यांची विक्री करता येणार नाही. परवान्याची मुदत संपल्यानंतर शिल्लक फटाक्यांचा साठा अधिकृत गोदामात किंवा घाऊक परवानाधारकाकडे परत जमा करणे बंधनकारक असणार आहेत. तसेच तात्पुरत्या फटाके विक्रीच्या स्टॉलपासून ५० मीटरच्या परिसरात आतषबाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे. विदेशी बनावटीचे फटाके विकण्यासही बंदी असल्याचे नियमावलीत नमूद आहे.

आवाज आणि साखळी बॉम्बबाबत काय आहेत नियम?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि पर्यावरण संरक्षण नियमांनुसार फटाक्यांच्या आवाजावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. फटाका उडविण्याच्या जागेपासून चार मीटर अंतरावर १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर प्रतिबंधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, १०० पेक्षा अधिक फटाके असलेल्या साखळी बॉम्बवर बंदी घालण्यात आली आहे. विशिष्ट आकाराच्या ‘ॲटमबॉम्ब’वरही कायदेशीर निर्बंध लागू राहणार आहेत.

एकूणच, दिवाळीचा आनंद घेताना ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळणे, नियमांचे पालन करणे आणि सार्वजनिक सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. फटाके खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे.

Buldhana: क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे भीक मांगो आंदोलन; ५ हजार रुपयांची भीक सरकारला पाठवली

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळी २०२६ मध्ये रात्री किती वाजेपर्यंत फटाके फोडता येतील?

    Ans: रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी आहे.

  • Que: तात्पुरत्या फटाके विक्रीचे परवाने कधी दिले जाणार आहेत?

    Ans: ६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी तात्पुरत्या फटाके विक्रीचे परवाने दिले जाणार आहेत. मुदत संपल्यानंतर विक्री करता येणार नाही.

  • Que: नियमांचे उल्लंघन केल्यास काय कारवाई होऊ शकते?

    Ans: फटाक्यांमुळे ध्वनीप्रदूषण किंवा इतर नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कायद्यांनुसार दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई होऊ शकते. तक्रारींसाठी MPCB च्या ‘महा पर्यावरण’ ॲपचा वापर करता येऊ शकतो.

Web Title: Diwali 2026 firecracker rules ban public places temporary sale permits maharashtra sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2026
  • High court

संबंधित बातम्या

दिवाळीपूर्वी महाबळेश्वरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू; टपऱ्या-हातगाड्यांवर पालिकेचा धडाका, मुख्य बाजारपेठेकडील रस्ता मोकळा
1

दिवाळीपूर्वी महाबळेश्वरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू; टपऱ्या-हातगाड्यांवर पालिकेचा धडाका, मुख्य बाजारपेठेकडील रस्ता मोकळा

Diwali 2026: धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंत यंदाची दिवाळी कधी? जाणून घ्या संपूर्ण यादी
2

Diwali 2026: धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंत यंदाची दिवाळी कधी? जाणून घ्या संपूर्ण यादी

Buldhana: क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे भीक मांगो आंदोलन; ५ हजार रुपयांची भीक सरकारला पाठवली
3

Buldhana: क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे भीक मांगो आंदोलन; ५ हजार रुपयांची भीक सरकारला पाठवली

Diwali Vastu Tips: दिवाळीच्या साफसफाईदरम्यान या चुका करणे टाळा, जाणून घ्या वास्तूचे नियम
4

Diwali Vastu Tips: दिवाळीच्या साफसफाईदरम्यान या चुका करणे टाळा, जाणून घ्या वास्तूचे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.