Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :उच्च न्यायालयात खुलासा; ६ कोटींचा माल जप्त ;अज्ञात कारखान्यात नायलॉन मांजाची निर्मिती

Nagpur News : सिल्वासा येथे नायलॉन मांजा तयार करणाऱ्या अज्ञात कारखान्याचा पोलिसांनी शोध घेत सुमारे ६ कोटींचा माल जप्त केला. या तपासावर उच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले असून, विदर्भातील उर्वरित दहा जिल्ह्यांतही अशीच कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 24, 2026 | 03:07 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • सिल्वासामध्ये नायलॉन मांजाच्या कारखान्याचा शोध
  • विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्येही तपासाचे निर्देश
  • जप्त केलेल्या मांजाच्या विल्हेवाटीबाबत माहिती द्या
Nagpur News : नायलॉन मांजाच्या जीवघेण्या व्यापाराचे मूळ शोधण्यासाठी पोलिसांनी केलेल्या तपासाला अखेर मोठे यश मिळाले आहे. सिल्वासा (दादरा आणि नगर हवेली) येथे नायलॉन मांजाचा मोठा स्रोत शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून, एका अज्ञात कारखान्यात तयार होणारा सुमारे ६ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांच्या तपासावर समाधान व्यक्त केले. तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही अशाच पद्धतीने तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

सिल्वासामध्ये नायलॉन मांजाच्या कारखान्याचा शोध

नायलॉन मांजाच्या पुरवठ्याचे मूळ शोधण्यात पोलिसांकडून होत असलेल्या विलंबाबद्दल यापूर्वी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. मागील सुनावणीदरम्यान पोलिसांनी पुरवठा साखळीच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा तपास केला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने कठोर भूमिका घेतली होती.

यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत विविध ठिकाणी छापे टाकले. पोलिस अधीक्षक (ग्रामीण) यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून या कारवाईची माहिती देण्यात आली. पोलिस पथकाने सिल्वासा येथे नायलॉन मांजाचा मोठा पुरवठा स्रोत शोधून काढला. तेथील एका अज्ञात कारखान्यात नायलॉन मांजाचे उत्पादन होत असल्याचे उघड झाले. या कारवाईत अंदाजे ६ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

Nagpur News : नागपूर परिमंडळाचे ‘थलाई कुथल’ प्रथम; राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा

विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्येही तपासाचे निर्देश

पोलिसांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नायलॉन मांजाच्या इतर संभाव्य स्रोतांचाही उल्लेख करण्यात आला आहे. न्यायालयाने या माहितीची दखल घेत पोलिसांच्या तपासाबाबत समाधान व्यक्त केले. गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा निर्धार असेल, तर पोलीस ते करू शकतात, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने केली.

याचवेळी न्यायालयाने नागपूर जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या पुरवठ्याचे स्रोत शोधण्यासाठी वापरलेली तपास प्रक्रिया विदर्भातील उर्वरित दहा जिल्ह्यांमध्येही राबवण्याचे निर्देश दिले. या सर्व जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन पोलिसांनी २९ ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे आता विदर्भातील नायलॉन मांजाच्या संपूर्ण पुरवठा साखळीवर पोलिसांची नजर राहणार आहे.

Nagpur News : दलित वस्ती सुधार निधी अडचणीत; ३५ कोटींच्या तरतुदीत ५५ कोटींच्या कामांना मंजुरी!

जप्त केलेल्या मांजाच्या विल्हेवाटीबाबत माहिती द्या

जप्त केलेल्या नायलॉन मांजाच्या विल्हेवाटीवरील सुनावणीदरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधित्व करणारे वकील सन्याल यांनी २३ डिसेंबर २०२५ रोजीच्या पत्राचा हवाला दिला. ज्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा येथील जिल्हाधिकाऱ्यांना कळवले होते की, नायलॉन मांजा एका सिमेंट कारखान्यात नष्ट केला जाऊ शकतो. अतिरिक्त सरकारी वकील उके यांनी सांगितले की, जप्त केलेल्या मांज्याची विल्हेवाट लावली आहे.

मनपाची बाजू मांडणारे अॅड. जेमिनी कसाट यांनी सांगितले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशा एका सिमेंट कारखान्याची माहिती चंद्रपूरला दिली होती. न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना जप्त केलेल्या नायलॉन मांज्याच्या विल्हेवाटीसाठी आवश्यक परवानग्या मिळवून १५ दिवसांच्या आत न्यायालयाला या माहितीची सूचना देण्याचे निर्देश दिले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिसांनी नायलॉन मांजाचा मोठा स्रोत कुठे शोधला?

    Ans: सिल्वासा येथे नायलॉन मांजाचे उत्पादन करणाऱ्या अज्ञात कारखान्याचा शोध लावला.

  • Que: सिल्वासामधील कारवाईत किती रुपयांचा माल जप्त करण्यात आला?

    Ans: पोलिसांनी अंदाजे ६ कोटी रुपयांचा माल जप्त केला

Web Title: Disclosure in high court goods worth 6 crore seized nylon kite string manja being manufactured in an undisclosed factorycp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • High court
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं
1

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं

Suraj Chavan Welcomes Daughter: Bigg boss फेम सूरज चव्हाणच्या लेकीचं थाटात स्वागत! चिमुकल्या राधासाठी घर सजवलं, व्हिडिओ व्हायरल
2

Suraj Chavan Welcomes Daughter: Bigg boss फेम सूरज चव्हाणच्या लेकीचं थाटात स्वागत! चिमुकल्या राधासाठी घर सजवलं, व्हिडिओ व्हायरल

Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Nagpur News :नागपूर परिमंडळाचे ‘थलाई कुथल’ प्रथम; राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा
4

Nagpur News :नागपूर परिमंडळाचे ‘थलाई कुथल’ प्रथम; राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.