Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : सेवानिवृत्तीनंतरही चित्रकलेने समाजसेवा! शिक्षक जगन्नाथ निकम यांचा प्रेरणादायी उपक्रम

सेवानिवृत्तीनंतरही शिक्षक जगन्नाथ निकम मेहकर येथील कलाश्री ड्रॉइंग क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची आवड जोपासत समाजसेवेचे कार्य करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा आणि ग्रेड परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 14, 2026 | 10:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सेवानिवृत्तीनंतरही समाजसेवेची भावना जपणारे शिक्षक जगन्नाथ निकम मेहकर येथील कलाश्री ड्रॉइंग क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य दिशा मिळत असून, चित्रकलेच्या माध्यमातून सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळत आहे.

‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी योजना-2026’ लागू; अपघाती मृत्यू, अपंगत्व आणि उपचारांसाठी लाखोंची आर्थिक मदत

विद्यार्थ्यांमध्ये कलेची अभिरुची वाढावी आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने निकम यांनी कलाश्री ड्रॉइंग क्लासची स्थापना केली. येथे विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने चित्रकलेचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा, विविध चित्रकला स्पर्धा आणि कला प्रदर्शनांसाठीही विशेष मार्गदर्शन केले जाते.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा तसेच ग्रेड परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यामुळे पालकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कलाश्री ड्रॉइंग क्लास महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कला क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा क्लास प्रेरणादायी ठरत आहे.

दीर्घकाळ शिक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतरही विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम आणि समाजसेवेची भावना कायम ठेवत जगन्नाथ निकम यांनी हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला आहे. आर्थिक लाभापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण करणे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास विकसित करणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे ते सांगतात.

कराड तालुक्यात खळबळ! ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच चर खोदून बंद केले शेतरस्ते; संपूर्ण गाव वेठीस, खरीप हंगामातील कामे ठप्प

सेवानिवृत्तीनंतरही कला संवर्धन आणि समाजहितासाठी अविरत कार्य करणारे जगन्नाथ निकम यांचा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षणासोबत संस्कार, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवत त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला असून, त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळत आहे.

Web Title: An inspiring initiative by teacher jagannath nikam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:10 PM

Topics:  

  • Buldhana

संबंधित बातम्या

Deulgaon Raja : अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त! तहसीलदारांच्या पथकाची धडक कारवाई
1

Deulgaon Raja : अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त! तहसीलदारांच्या पथकाची धडक कारवाई

प्लास्टिकमुक्त बुलढाणा मोहिमेला वेग! नियम मोडणाऱ्यांवर दंडासह कारावासाची कारवाई; सीईओंचे निर्देश
2

प्लास्टिकमुक्त बुलढाणा मोहिमेला वेग! नियम मोडणाऱ्यांवर दंडासह कारावासाची कारवाई; सीईओंचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.