
फोटो सौजन्य - Social Media
मंगळवारी टाकरखेड भागिले शिवारातील धरण कमानीजवळ अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा टिप्पर महसूल पथकाच्या निदर्शनास आला. पथकाने तत्काळ कारवाई करत वाहन ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर आणि दंडात्मक कारवाईसाठी हा टिप्पर देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.
या मोहिमेत मंडळ अधिकारी विजय हिरवे तसेच ग्राम महसूल अधिकारी संजय बरांडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्राथमिक चौकशीत संबंधित टिप्पर चिखली येथील आकाश काळे यांचा असल्याची माहिती चालकाने दिल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
सांगली पोलिसांची मोठी कारवाई; २.१५ कोटींचा गांजा-कोकेन वैज्ञानिक पद्धतीने नष्ट
महसूल प्रशासनाने स्पष्ट केले की, तालुक्यात सुरू असलेले अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असून, अवैध रेती व्यवसायाला कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.