Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्लास्टिकमुक्त बुलढाणा मोहिमेला वेग! नियम मोडणाऱ्यांवर दंडासह कारावासाची कारवाई; सीईओंचे निर्देश

बुलढाणा जिल्हा परिषद प्रशासनाने प्लास्टिकमुक्त जिल्हा घडवण्यासाठी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 08, 2026 | 09:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बुलढाणा जिल्ह्यात प्लास्टिकमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेच्या दृष्टीने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक सर्व पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना पाठविण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात

प्रशासनाने एकेरी वापरातील प्लास्टिकवर नियंत्रण, प्लास्टिक कचऱ्याचे स्रोतस्थानी वर्गीकरण, संकलन, पुनर्वापर आणि शास्त्रोक्त विल्हेवाट यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नागरिकांमध्ये प्लास्टिकमुक्त जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतींना कचरा व्यवस्थापनाची योग्य यंत्रणा उभारणे, शाळा, बचत गट आणि ग्रामस्थांचा सहभाग वाढवणे, तसेच आठवडी बाजारात कापडी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कचरा फेकल्यास 100 ते 500 रुपये, प्लास्टिक जाळल्यास 500 ते 2 हजार रुपये, तर अनधिकृतपणे प्लास्टिक कचरा टाकल्यास 500 ते 5 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. बंदी असलेल्या एकेरी वापराच्या प्लास्टिक वस्तूंची विक्री किंवा साठा आढळल्यास 1 हजार ते 5 हजार रुपये दंड, पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड आणि वारंवार नियम मोडल्यास 25 हजार रुपयांपर्यंत दंड व तीन महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.

कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

याशिवाय जत्रा, उत्सव, विवाह समारंभ आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजकांना निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणे, नाले आणि जलस्रोतांमध्ये प्लास्टिक कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासह उघड्यावर प्लास्टिक जाळण्यावरही कठोर कारवाई केली जाणार आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सतीश देशमुख यांनी सर्वांनी सहकार्य करून बुलढाणा जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Momentum gathers for the plastic free buldhana campaign penalties and imprisonment for rule breakers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news

संबंधित बातम्या

Dheeraj Lingade : संजय राऊतांचा ‘तो’ खळबळजनक दावा काँग्रेस आमदार धीरज लिंगाडेंनी फेटाळला!
1

Dheeraj Lingade : संजय राऊतांचा ‘तो’ खळबळजनक दावा काँग्रेस आमदार धीरज लिंगाडेंनी फेटाळला!

अनसिंग परिसरात पेरण्या अंतिम टप्यात! विवंचनेत सापडलेल्या बळीराजा दिलासा
2

अनसिंग परिसरात पेरण्या अंतिम टप्यात! विवंचनेत सापडलेल्या बळीराजा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.