Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिरज पश्चिममध्ये लाळ्या आजाराचा उद्रेक; मौजे डिग्रज, कर्नाळ व पद्माळेत जनावरे मृत्युमुखी

मोजे डिग्रज गावातच आतापर्यंत ७ ते ८ जनावरे लाळ्या आजारामुळे दगावली असून, उर्वरित गावांमध्येही मोठ्या प्रमाणात जनावरे बाधित झाली आहेत. या तीन गावांतील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक जनावरांना या आजाराची तीव्र लागण झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2026 | 09:38 AM
मिरज पश्चिममध्ये लाळ्या आजाराचा उद्रेक; मौजे डिग्रज, कर्नाळ व पद्माळेत जनावरे मृत्युमुखी

मिरज पश्चिममध्ये लाळ्या आजाराचा उद्रेक; मौजे डिग्रज, कर्नाळ व पद्माळेत जनावरे मृत्युमुखी

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : सांगली जिल्ह्यातील मौजे डिग्रज, कर्नाळ व पद्माळे या तीन गावांमध्ये जनावरांमध्ये लाळ्या आजाराचा गंभीर उद्रेक झाला असून, उपचाराअभावी अनेक जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मोजे डिग्रज गावातच आतापर्यंत ७ ते ८ जनावरे लाळ्या आजारामुळे दगावली असून, उर्वरित गावांमध्येही मोठ्या प्रमाणात जनावरे बाधित झाली आहेत. या तीन गावांतील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक जनावरांना या आजाराची तीव्र लागण झाली आहे. आजारामुळे जनावरांच्या तोंडातून लाळ गळणे, पायांच्या खुरांचे नुकसान होणे अशी गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. ही तीनही गावे एका पशुवैद्यकीय विभागांतर्गत येतात. मात्र, या विभागात केवळ एकच डॉक्टर उपलब्ध असून, त्यांच्या पदोन्नतीनंतर अतिरिक्त जबाबदारी दुग्धशाळा विभागाकडे गेल्याने या गावांकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, वेळेवर उपचार न मिळाल्याने जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेदेखील वाचा : कराड नगरपालिकेत समित्यांची निवड बिनविरोध; पहिल्याच सभेत स्थायीसह विषय समित्यांवर शिक्कामोर्तब

या तीन गावांमध्ये सुमारे १२ ते १३ हजार जनावरे असून, त्यातून दररोज अंदाजे १४ ते १५ हजार लिटर दूध उत्पादन होते. या दूधविक्रीवर गावातील शेतकऱ्यांचे कुटुंब, शिक्षण व दैनंदिन खर्च अवलंबून आहेत. एका जनावराची सरासरी किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याने आर्थिक नुकसानही प्रचंड आहे.

लाळ्या आजाराने बाधित सर्व जनावरांचे लसीकरण करावे

“तातडीने अतिरिक्त पशुवैद्यकीय डॉक्टरांची नियुक्ती करून लाळ्या आजाराने बाधित सर्व जनावरांचे लसीकरण करावे. तसेच मृत जनावरांच्या मालकांना त्वरित योग्य ती नुकसानभरपाई द्यावी; अन्यथा या प्रश्नावर स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

– सुनिल फराटे, जिल्हाध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष.

हेदेखील वाचा : Thane News : ठाण्यातील १८ मजली इमारतीला भीषण आग, दोन जण जखमी तर ७० जणांना वाचवण्यात यश

Web Title: An outbreak of foot and mouth disease in miraj west

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • sangli news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.