Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुरुमाने ओव्हरलोड असलेला डंपर थेट धडकला बस स्टँडवर; दोघांचा मृत्यू

बस स्थानक परिसरात उतार असल्याने या उतारावरून जाणाऱ्या ओव्हरलोडेड डंपर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा डंपर सरळ बस स्थानकावर चढला. डंपरच्या धडकेने बस स्थानकाचे मोठे नुकसान झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 16, 2025 | 02:54 PM
मुरुमाने ओव्हरलोड असलेला डंपर थेट धडकला बस स्टँडवर; दोघांचा मृत्यू

मुरुमाने ओव्हरलोड असलेला डंपर थेट धडकला बस स्टँडवर; दोघांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक येथील खलाणे येथे अपघात झाला. या अपघातात मुरुमाने ओव्हरलोड असलेला डंपर भेट गावाच्या पत्री बस स्थानकावर धडकला. यात बस स्थानकाचा पूर्ण चक्काचूर झाला. यात एका महिलेचा डंपरखाली येऊन जागीच मृत्यू झाला. तर शेडमध्ये बसलेल्या एका पुरुषाला डंपरच्या धडकने जीव गमावावा लागला. मुरूम भरलेला (एमएच ०८ एपी १२८२) या क्रमांकाचा डंपर सकाळी नऊच्या सुमारास खखलाणे गावाकडे येत होता.

बस स्थानक परिसरात उतार असल्याने या उतारावरून जाणाऱ्या ओव्हरलोडेड डंपर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा डंपर सरळ बस स्थानकावर चढला. डंपरच्या धडकेने बस स्थानकाचा पूर्ण चक्काचूर झाला. या अपघातात आशाबाई रुपचंद भील (वय 53, खलाणे) ही महिला डंपरखाली अडकली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर मका पारसा पावरा (वय 53, ब्राम्हणपुरी ता. शहादा) हे बस स्थानकाच्या डेअरीजवळ सोनगीरला बाजारास जाण्यासाठी बसले होते. तेही दूर फेकले गेले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

हेदेखील वाचा : Vijay Deverakonda Accident: विजय देवरकोंडाच्या कारचा भीषण अपघात! रश्मिकाशी नुकताच झाला होता साखरपुडा; चाहत्यांकडून चिंता व्यक्त

दरम्यान, डंपरच्या धडकेने आणखी दोन जखमी झाले आहेत. खलाणे येथील लताबाई शिवाजी भील (वय ४०) व विमलबाई भगवान भील त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे.

परिसरात शोककळा

घटनास्थळी ठाण्याचे पोलिस पाटील मनोज भदाणे, ग्रामपंचायत सदस्य रोशन टाटीया, माजी सरपंच विजय टाटीया, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम आदी प्राथमिक माहिती मिळताच तहसीलदार नितीन देवरे, शिंदखेडा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बारे यांनी घटनास्थळी भेट दिली व मदत कार्य ताबडतोब सुरू केले. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करुन या प्रकरणाची सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.

कोल्हापुरात भीषण अपघात

सातेरी डोंगरावर भीषण अपघात झाला. सातेरी देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना कारवरील ताबा सुटल्याने कार सुमारे शंभर फूट खाली कोसळली. या अपघातात दत्तात्रय रघुनाथ पवार (वय ३२ रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) आणि अश्विनी दत्तात्रय पवार (वय २८ रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) हे दाम्पत्य जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Web Title: An overloaded dumper crashed directly into a bus stand 2 people died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Accident News
  • Satara Accident

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.