आनंदाचा शिधा योजना अखेर बंद, कोट्यवधी नागरिकांना बसणार फटका (फोटो सौजन्य-X)
Anandacha Shidha News in Marathi: राज्य सरकारची लोकप्रिय योजना आनंदाचा शिधा योजना अखेर बंद करण्यात आली. होणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली होती. त्या या सणाच्या दिवशी राज्यातील १ कोटी ६३ लाख लोकांना याचा लाभ मिळत होता. मात्र आता राज्यातीर तिजोरीमध्ये असलेल्या खडखडाटीमुळे ही योजना बंद करण्यात आल्याची चर्चा आहे.
आनंद शिधाअंतर्गत रेशनकार्डधारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होतं. ही योजना आता बंद होणार आहे. आर्थिक भर वाढल्याने सरकारने ही योजना बंद करण्यात आल्याचे म्हटलं जात आहे. तसेच महायुती सरकारने 2022 मध्ये ही योजना सुरु केली होती. मात्र ही योजना बंद केल्याने यंदाचा गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळी या सारख्या सणांना सरकारकडून मिळणारे खाद्यपदार्थ मिळणार नाहीत. त्यामुळे पात्र नागरिकांना या वस्तू बाजारभावाप्रमाणेच खरेदी कराव्या लागणार आहेत.
नवीन सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात इतर योजनांसोबत आनंद शिक्षा योजना घेण्यात आली.या योजनेच्या माध्यमातून दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, आंबेडकर जयंती अशा सणांच्या निमित्ताने फक्त 100 रुपयांमध्ये पाच वस्तू दिल्या जायच्या.
गेल्या निवडणुकीत महायुतीकडून अनेक योजनांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अनेक योदनांना निधीचं वाटप करण्यात आलं आहे. त्यामध्ये आनंदाचा शिधा या योजनेला कुठेतरी बगल दिल्याचं दिसून आलं. त्यामुळे आनंदाचा शिधा ही योजना आता बंद झाल्याचं स्पष्ट आहे.
‘आनंदाचा शिधा’ योजनेत या सणासुदीच्या काळात रेशन कार्ड धारकांना 100 रुपयांमध्ये एक किलोत तेल, रवा, चणाडाळ आणि साखर दिली जात होती. तसेच 1 कोटी 60 लाख पात्र लाभार्थ्यांना या किटचे वाटप केले जात होते. त्यासाठी प्रत्येक सणाला 350 कोटींची तरतूद करण्यात येत होती. मात्र आता ही योजना बंद केल्यामुळे आता कोट्यावधी लोकांना याचा फटका बसला आहे. ही योजना 2022 मध्ये सुरु करण्यात आली होती. त्यावेळी या योजनेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 2023 मध्ये गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळी सणाला, तर 2024 मध्ये या सणांसोबतच अयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानेही आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात आले होते. मात्र ही लोकप्रिय योजना सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याने बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत होते. या योजनेवर सुमारे 602 कोटी रुपये खर्च करण्यात येत होते. मात्र, आता गुढीपाडवा आला तरी आनंदाचा शिधा योजनेसाठी निधीचा निर्णय घेण्यात आला नाही. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी सुरु केलेली 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी ही योजनेला देखील निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. तसेच एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेली ज्येष्ठ नागरिकांना तीर्थाटनाची योजनेचा देखील बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे. निधीमध्ये अर्थमंत्र्यांनी या योजनेचा उल्लेख केलेला नाही.