
फोटो सौजन्य: Gemini
विकास किशोर वाघ (वय ३५, रा. वाधगल्ली, नालेगाव) हे मार्केट यार्ड आणि नेप्ती नाका येथील कांदा मार्केटमध्ये खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची आंध्र प्रदेशातील ‘श्रीनिवास ट्रेडर्स’चे मालक परमात्मा मारीशेट्टी यांच्याशी ओळख झाली. नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत वाघ यांनी विश्वासातून मारीशेट्टी यांना मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री केली. या दरम्यान, एकूण २ कोटी २९ लाख ६८ हजार २५१ रुपयांचा कांदा माल ट्रान्सपोर्टद्वारे आंध्र प्रदेशात पाठवण्यात आला. मात्र, मारीशेट्टी यांनी त्यापैकी केवळ १ कोटी ४८ लाख ०१ हजार ०११ रुपयेच दिले. उर्वरित ८१ लाख ६७ हजार २४० रुपये वारंवार मागणी करूनही देण्यास टाळाटाळ सुरू केली.
पालिका निवडणुकीचा वाजला बिगुल! राजकीय पक्षाची जोरदार तयारी केली सुरु, बैठकांना आले उधाण
पैसे कधी देतो, कधी देतो असे सांगून वेळ मारून नेल्याने वाघ यांनी थेट आंध्र प्रदेशातील श्रीनिवास ट्रेडर्स गाठले. तेथेही त्याने तीन महिन्यांत रक्कम देण्याचे आश्वासन दिले. तथापि, तीन महिने उलटूनही पैसे न मिळाल्याने आणि पुन्हा मागणी केल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने वाघ यांची खात्री पटली की, कांदा व्यापारी परमात्मा मारीशेट्टी याने त्यांचा विश्वासघात करत फसवणूक केली आहे.