वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि कॉंग्रेसची जोरदार तयारी सुरु आहे (फोटो - सोशल मीडिया)
अमृत देशमुख : नांदेड : वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. यासाठी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गटाने इच्छुकांच्या मुलाखती घेवून निवडणुकीच्या अनुषंगाने पहिले पाऊल टाकले आहे. तीनही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. महायुती एकत्रपणे लढेल की, नाही तूर्तास सांगणे कठीण असले तरी, युतीसाठी भाजप आठही असल्पाचे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले आहे.
भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे असा अतंर्गत संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे, मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी असून भाजपमधील अंतर्गत कलह थांबवण्याचे जिल्हा वार्ताप नांदेड आव्हानही या नेत्यांसमोर आहे. मनपा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण गरम होत आहे, भाजपमध्ये मुलाखतीवरून घडलेले ‘नाट्य’ समाजमाध्यमातून तसेच वृत्तपत्रांमधून तुफान गाजले. त्यानंतर निष्ठावंतांनी केलेली प्रतिक्रियांची ‘बरसात’ चर्चेचा विषय ठरली होती. भाजपकडून खासदार अजित गोपछडे, संजय कौडगे यांच्या नेतृत्वाखाली ‘अंत्योदय’ मध्ये ‘मुलाखत टप्पा-२’ हा दोन दिवसीय पडला.
हे देखील वाचा : ठाकरेंशी कौटुंबिक संबंध तरी घोसाळकरांनी का केला भाजप प्रवेश? प्रवीण दरेकर यांनी स्पष्टच सांगितलं
इच्छुकांमध्ये कार्यक्रम पार जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांचा समावश होता. महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी. सावंत या कोअर कमिटीच्या सदस्यांनी ‘अंत्योदय’मधील मुलाखतींना लावलेली हजेरी ‘लक्षवेधी’ ठरली. मनपावर भाजपचा झेंडा फडकाविण्याचा संकल्प माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला आहे. जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित आणण्याचे ‘कसब’ त्यांना दाखवावे लागणार आहे. एकसंघ भाजप ठेवली तरच सत्तेत जाण्याचा मार्ग प्रशस्त होवू शकते अन्यथा भाजपमधील गटबाजीचा फायदा विरोधकांना होवू शकतो, अशी प्रतिक्रिया जुन्या जाणत्या ‘भाजपाई’ कार्यकत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
मनपावर आजपर्यंत काँग्रेसने निर्विवाद सत्ता गाजविली आहे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे आजपर्यंत ‘किंगमेकर’ राहिले आहेत. भाजपला पहिल्यांदाच सत्तेत येण्याची संधी त्यांच्यामुळे चालून आली आहे. या संधीचे भाजपकडून कितपत सोने केले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपची तयारी’ जोरोशोरो से’ सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली ‘मिशन महापालिका’ हाती घेतले आहे. महापालिकेच्या राजकारणातील ‘चतुरत्र’ नेते अशी ओळख असणारे माजी महापौर ओमप्रकाश पोकर्णा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत, त्यामुळे मनपा निवडणुकीवर त्यांचा प्रभाव राहणार आहे. भाजपशी राष्ट्रवादीची युती होईल की, नाही हे. सांगणे कठीण असून दोन्ही पक्षातील नेत्यांचे एकमेकांशी असलेले ‘राजकीय वैर’ युतीला ब्रेक लावणारे ठरू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून स्वबळाची असल्याची चर्चा आहे.
हे देखील वाचा : नागपूरची थंडी नेत्यांना होईना सहन! हिवाळी अधिवेशनामध्ये दोन मंत्री,10 आमदार अन् 1355 कर्मचारी पडले आजारी
जोरदार तयारी सुरू
महायुतीतील तिसरा घटकपक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गटानेही माजी मंत्री सिद्धराम मेहत्रे यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या
मुलाखती घेतल्या या कार्यक्रमात मोठे मानापमान नाट्य घडले, पदाधिकाऱ्यांनी आमदारांविरूद्ध तीव्र रोष प्रकट केला.
मनपाच्या निवडणुकीत शिंदे स्वतंत्र लढणार की युती करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेस अजूनही निद्रेत
महायुतीमध्ये मनपा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असताना काँग्रेसच्या तंबूत अजून शांतता असून राष्ट्रवादी काँग्रेस श.प. गट, उबाठा शिवसेनेधी हालचालही थंडावलेली दिसून येत आहे. मनपा निवडणुकीत या तीन पक्षांचे भवितव्य काय राहणार ? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून श्याम दरक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये गट तट मोठ्या प्रमाणावर असून याचा फटका या निवडणूकीत काँग्रेसला फटका बसू शकतो.






