Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh : “धनंजय मुंडेंचा राजीनामा तातडीने घ्यावा”; अजित पवारांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची मागणी

Santosh Deshmukh Murder Case : अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत संतोष देशमुख खूनप्रकरणी महत्त्वाचे पुरावे त्यांच्यासमोर सादर करीत थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 27, 2025 | 08:26 PM
Santosh Deshmukh: "धनंजय मुंडेंचा राजीनामा तातडीने घ्यावा"; अजित पवारांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची मागणी

Santosh Deshmukh: "धनंजय मुंडेंचा राजीनामा तातडीने घ्यावा"; अजित पवारांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

Anjali Damania and Deputy Chief Minister Ajit Pawar meeting : महाराष्ट्राच्या राजकारणाती एक अनोखी भेट म्हणता येईल. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. संतोष खून प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे त्यांनी अजित पवारांसमोर सादर केली.  महाराष्ट्रात सध्या सर्वात हाय व्होल्टेज प्रकरण असलेल्या संतोष देशमुख खून प्रकरणात अनेक नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणानंतर वाल्मिक कराडच्या समस्या आणखी वाढणार आहेत. पुरावे सादर केल्यानंतर अंजली दमानिया यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा

महाराष्ट्रात असे राजकारणी नको, हे असले घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात नको आहे. त्यामुळे धनंजय मुंडेचा राजीनामा तातडीने घ्यावा, असे मोठे वक्तव्य अंजली दमानिया यांनी केले. मी सर्व पुरावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर केले आहेत. अजित पवार यांनी सर्व पुरावे गंभीररित्या पाहिले असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले. एवढे पुरावे सादर केल्यानंतरही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर हे अत्यंत चुकीचे होणार आहे.

हेही वाचा: Santosh Deshmukh: देशमुख हत्या प्रकरणातील ‘या’ मुख्य आरोपीला SIT कोठडी; मोबाईलमध्ये काय सापडलं?

महाराष्ट्राच्या राजकारणातील अनोखी भेट

महाराष्ट्राच्या राजकारणात अंजली दमानिया यांनी काही वर्षांपूर्वी अजित पवार यांच्या गंभीर आरोप करीत मोठे खुलासे केले होते. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडली होती. त्यामुळे अंजली दमानिया आणि अजित पवार यांचा 36 चा आकडा आहे. हे सर्व असताना त्यांनी अजित पवार यांची भेट घेणे हे निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घटना आहे. हे सर्व बाजूला ठेवून अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख खून प्रकरणी महत्त्वाचे पुरावे अजित पवार यांना सादर केले. हेच त्यांनी माध्यमांसमोर सांगत मी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले परंतु ही घटना किळसवाणी आहे. हा प्रकार महाराष्ट्रात नको म्हणून मी त्यांना भेटली आहे.

वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी

संतोष देशमुख हत्या प्रकरणात केज कोर्टाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडला केज कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याधी केज कोर्टाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली होती. आज वाल्मीक कराडची सीआयडी कोठडी संपली होती. त्यामुळे आज वाल्मीक कराडला पुन्हा केज कोर्टात हजर करण्यात आले होते. याशिवाय कराडवर मकोका (MCOCA) लावण्यात आला आहे.

संतोष देशमुख खून प्रकरणात नवनवीन खुलासे

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणातील 7 आरोपीवर मकोका लावण्यात आला आहे. वाल्मीक कराडवर देखील मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान आता बीडमधून एक आणखी महत्वाची बातमी समोर येत आहे.

हेही वाचा: Walmik Karad news: वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्याची तयारी; ‘एसआयटी’ने उचलले मोठे पाऊल

सुदर्शन घुलेवर आरोप

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला सुदर्शन घुलेला कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुदर्शन घुलेला आता एसआयटी कोठडी सुनावली आहे. एसआयटीने सुदर्शन घुलेला पोलीस कोठडी देण्याची मागणी कोर्टासमोर केली होती. त्या अर्जावर आज सुनावणी पार पडली. दरम्यान त्यानंतर कोर्टाने सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधून सर्व डाटा हस्तगत करण्यात आला आहे. देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुदर्शन घुलेने वाल्मीक कराडशी फोनवरून संभाषण केले होते. सुदर्शन घुलेच्या अर्जावर बीड कोर्टात सुनावणी पार पडली. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलपैकी एका फोनचे लॉक ओपन करणे आणि इतर तपासासाठी पोलिसानी घुलेच्या कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजूनच युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने घुलेला कोठडी सुनावली आहे.

Web Title: Anjali damania and deputy chief minister ajit pawar meeting discuss for an hour demand dhananjay mundes resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 07:50 PM

Topics:  

  • Deputy Chief Minister Ajit Pawar
  • maharashtra

संबंधित बातम्या

भारतीय संस्कृतीचा वारसा जपा आणि विकसित भारताच्या संकल्पात योगदान द्या; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे युवकांना आवाहन
1

भारतीय संस्कृतीचा वारसा जपा आणि विकसित भारताच्या संकल्पात योगदान द्या; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे युवकांना आवाहन

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड
2

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही
3

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
4

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.