बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला काही झाल्याचा अंबादास दानवेंचा संशय (फोटो - सोशल मीडिया)
बीड: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणातील 7 आरोपीवर मकोका लावण्यात आला आहे. वाल्मीक कराडवर देखील मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान आता बीडमधून एक आणखी महत्वाची बातमी समोर येत आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला सुदर्शन घुलेला कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुदर्शन घुलेला आता एसआयटी कोठडी सुनावली आहे. एसआयटीने सुदर्शन घुलेला पोलीस कोठडी देण्याची मागणी कोर्टासमोर केली होती. त्या अर्जावर आज सुनावणी पार पडली. दरम्यान त्यानंतर कोर्टाने सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधून सर्व डाटा हस्तगत करण्यात आला आहे. देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुदर्शन घुलेने वाल्मीक कराडशी फोनवरून संभाषण केले होते. सुदर्शन घुलेच्या अर्जावर बीड कोर्टात सुनावणी पार पडली. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलपैकी एका फोनचे लॉक ओपन करणे आणि इतर तपासासाठी पोलिसानी घुलेच्या कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजूनच युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने घुलेला कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा: Santosh Deshmukh Case: पोलिसांच्या जाळ्यात कसे अडकले सुदर्शन घुले, सुधीर सांगळे? वाचा इनसाईड स्टोरी
पोलिसांच्या जाळ्यात कसे अडकले सुदर्शन घुले, सुधीर सांगळे?
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे घटनेच्या दिवसापासून फरार होते. काल या दोघांनाही अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान या दोघांनी गेल्या काही दिवसात कुठे कुठे गेले, काय केलं, इतके दिवस कुठे राहिले यावर खुलासे केले आहेत.9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर इंगळे फरार झाले.
बीडमधून फरार झाल्यानंतर ते गुजरातला पळून गेले. गुजरातमधील एका देवस्थानात त्यांनी 3 जानेवारीपर्यंत मुक्काम केला. पण पैसे संपल्याने ते पुन्हा पुण्यात दाखल झाले. पुण्यात एका व्यक्तीला भेटून त्याच्याकडून पैसे घेऊन पुन्हा फरार होण्याचा त्याचा मानस होता. पण त्यापूर्वीच बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या. 4 जानेवारीला पहाटेच्या सुमारास त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परवा म्हणजेच 3 जानेवारीला या प्रकरणातील डॉ. वायभसे दाम्पत्याची चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या दोघांना अटक करण्यात आली.
हेही वाचा: Walmik Karad news: वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्याची तयारी; ‘एसआयटी’ने उचलले मोठे पाऊल
वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्याची तयारी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या कारागृहात असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे कारनामे संपता संपत नाहीयेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कराडच्या गैरकृत्यांवर प्रकाश टाकत अनेक धक्कादायक खुलासे केले. अशातच वाल्मिक कराडचा नवा कारनामा समोर आला आहे. बीडमधील कराडच्या निकटवर्तीयाचा चक्क देशी दारूचा कारखाना असल्याची संतापजनक बाब उघड झाली आहे.