Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anjali Damania : “धनंजय मुंडे माझं दैवत अन् वाल्मिक कराड… ”, अंजली दमानियांची ती पोस्ट चर्चेत

बीडच्या मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 23, 2025 | 02:31 PM
“धनंजय मुंडे माझं दैवत अन् वाल्मिक कराड... ”, अंजली दमानियांची ती पोस्ट चर्चेत

“धनंजय मुंडे माझं दैवत अन् वाल्मिक कराड... ”, अंजली दमानियांची ती पोस्ट चर्चेत

Follow Us
Follow Us:

बीडच्या मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. यानंतर या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे. वाल्मिक कराडवरही त्यांनी आरोप केले आहेत. याच प्रकरणात दोनवेळा त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली आहे. मात्र धनंजय मुंडेंवर कारवाई झालेली नाही. आता अंजली दमानियांनी पुन्हा एकदा एक पोस्ट केली आहे जी चर्चेत आहे.

धनंजय मुंडे माझे दैवत वाल्मिक कराड माझे नेते. असे म्हणणारे बाळाजी तांदळे, यांना पत्र देऊन, त्यांना बरोबर घेऊन, त्यांच्याच जवळच्या मित्रांचा, जे खुनाचे आरोपी आहेत, ह्यांना घेऊन पोलिस शोध करू शकतात का ? जे पकडले गेले, ते “मुद्दाम पकडवून, बळी दिले गेले” ह्यात शंका आहे का ?… — Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 23, 2025

वाल्मिक कराड माझे नेते…

असे म्हणणारे बाळाजी तांदळे, यांना पत्र देऊन, त्यांना बरोबर घेऊन, त्यांच्याच जवळच्या मित्रांचा, जे खुनाचे आरोपी आहेत, ह्यांना घेऊन पोलिस शोध करू शकतात का ? जे पकडले गेले, ते “मुद्दाम पकडवून, बळी दिले गेले” यात शंका आहे का ? म्हणूनच कराड फरार राहू शकले आणि आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी दाखवले गेले की पोलिसांचा तपास चालू आहे. जर प्रकरण लावून धरलं नसतं तर कराडला देखील अटक झाली नसती. बालाजी तांदळे, जो जमिनीचा बंदोबस्त करतो, प्रत्येक स्थळी उपस्थित असतो, तो शोधले आरोपींना ? ह्याची नुसती चौकशी करून त्याला सोडून दिले ? ह्याला जर थर्ड डिग्री वापरून चौकशी केली, तर कळेल सगळा कुणाच्या सांगण्यावरून होत होते. पी आय गोसावी आणि भागवत शेलार यांचे सीडीआर जाहीर करा. पहिल्या दोन आरोपींची TIP कुणाकडून आली ? देवेंद्र फडणवीस आता तरी काही बोलणार का अजून त्यांना गरज वाटत नाही? अशी पोस्ट अंजली दमानियांनी केली आहे.

अंजली दमानिया बीडच्या मस्साजोग प्रकरणात धनंजय मुंडेंवर सातत्याने आरोप करत आहेत. तसंच त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत आहेत.

इफकोमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचा देखील मुद्दा अंजली दमानिया यांनी याच महिन्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित केला. कृषी घोटाळा नंबर २ चा उल्लेख करत, यामध्ये धनंजय मुंडे कोणत्याही पद्धतीने वाचत नाहीत असेही अंजली दमानिया म्हणाल्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचं एक पत्र माध्यमांना दाखवले. हे पत्र मंत्र्‍यांनी लिहिलेले आहे पण त्यावर तारीख टाकण्यात आलेली नाही असंही त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं. पत्र वाचून दाखवत अंजली दमानिया म्हणाल्या की, दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीती विचारार्थ ठेवण्यात आलेला, मंजुर झालेला कृषीविभागाच्या प्रस्तावाचे इतिवृत्त कायम करण्यात आला असे पत्रात लिहिले आहे. पण अंजली दमानिया यांनी असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचा दावा केला. “याचा अर्थ हा मंत्री कोणत्या थराला जाऊ शकतो याचे हे उदाहरण आहे. २३ आणि ३० तारखेला कुठल्याही प्रकारचा असा निर्णय झालेला नाही,” असे अंजली दमानिया यावेळी म्हणाल्या होत्या.

Web Title: Anjali damania post on dhananjay munde walmik karad and balaji tandale latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 02:03 PM

Topics:  

  • Anjali Damnia
  • dhananjay munde
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
1

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.