Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satish Bhosale Case : “नाहीतर उद्या उठून हाही दुसरा वाल्मिक कराड बनेल…; ‘त्या’ व्हिडिओवरुन अंजली दमानिया आक्रमक

बीडच्या शिरुरमध्ये आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर आता अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 06, 2025 | 12:51 PM
Maharashtra Politics : 'महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण खरंच कळतं का?'; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल

Maharashtra Politics : 'महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण खरंच कळतं का?'; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

बीड :  राज्यामध्ये अत्याचारांच्या प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. बीडमधील कायदा हातात घेतलेले अनेक व्हिडिओ आता समोर येत आहेत. यामुळे बीड, जालनामधील प्रशासन, पोलीस आणि राजकारण्यांवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असताना भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आता मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुरेश धस यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याने एका तरुणाला नग्न करुन अमानुषपणे मारहाण केली आहे. यावरुन आता अंजली दमानिया यांनी जोरदार टीका केली आहे.

बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. मारहाण करणारा आरोपी हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यानंतर सुरेश धस यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. “याप्रकरणी सुरेश धसांनी स्टेटमेंट द्यावे, या कार्यकर्त्यावर काय कारवाई करत आहात ते सांगावं. नाहीतर उद्या उठून हाही दुसरा वाल्मिक कराड बनेल,” अशा शब्दांत अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

“मी काही व्हिडीओ माझ्या सोशल मीडियावर टाकले आहेत. रक्तबंबाळ झालेल्या माणसाचे दात सतीश भोसलेने पाडले आहेत. भोसलेवर आजच्या आज गुन्हा दाखल झाला पाहिजे. सुरेश धसांना तो बॉस आणि माझा विठ्ठल म्हणतो. तो सरकार म्हणतो. सुरेश धस यांनी यावर खुलासा करावा. हे सर्व एका माळेचे मनी आहेत. त्या भोसलेच्या प्रत्येक व्हिडीओत आणि फोटोत त्यांच्या हातात सोनं आहे. गळ्यात सोनं आहे. मी बाई असून माझ्या हातात सुद्धा सोन्याच्या बांगड्या नाहीत. यांच्याकडे कुठून आलं येवढं सोनं? सुरेश धस यांनी स्टेटमेंट द्यावं. या कार्यकर्त्यावर काय कारवाई करत आहात. उद्या तो वाल्मिक कराड होईल. हे लोक वाटेल तसं लोकांना मारत आहेत. सुरेश धस कोण आहे हा सतीश भोसले?” असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे.

हे काय आहे काय ? गृहमंत्र्यांनी आणि श्री सुरेश धस यांनी उत्तर द्यावे. हा मारणारा माणूस सुरेश धस चा कार्यकर्ता आहे का ? बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडीओ पहा अँकर – बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा हा वीडियो पहा. अद्याप शिरूर पोलीस… pic.twitter.com/aAO4s9vedx — Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 5, 2025

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे त्या म्हणाल्या की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असा महाराष्ट्र नको असेल तर त्यांनी अधिवेशनात यावर बोललं पाहिजे. नाही तर मी अधिवेशनाबाहेर प्रोटेस्ट करणार आहे. आजचा दिवस मी वाट पाहीन. उद्या सकाळपासून मी ठिय्या देणार आहे. मी हे सर्व फोटो घेऊन बसणार आहे. अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. बास झाले हे सर्व धंदे महाराष्ट्रात अशी दहशत नको,” अशी आक्रमक भूमिका अंजली दमानिया यांनी घेतली आहे.

 

Web Title: Anjali damania reaction on satish bhosale crime case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • anjali damania
  • Beed crime News
  • Suresh Dhas

संबंधित बातम्या

Anjali Damania on Kharat: भोंदू खरातचे राजकीय सिंडिकेट? चाकणकर, शिंदे, तटकरे अन् पाटील; अंजली दमानियांची धक्कादायक यादी!
1

Anjali Damania on Kharat: भोंदू खरातचे राजकीय सिंडिकेट? चाकणकर, शिंदे, तटकरे अन् पाटील; अंजली दमानियांची धक्कादायक यादी!

Anjali Damania : “तेव्हा खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता..; रुपाली चाकणकरांवर अंजली दमानिया भडकल्या
2

Anjali Damania : “तेव्हा खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता..; रुपाली चाकणकरांवर अंजली दमानिया भडकल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.