Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बिंदुसरा नदीपात्रात तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह; पुलावरून फेकले की नदीत नेऊन ठेवले?

गुलाबी फ्रॉक, हातात काळ्या-पिवळ्या मण्यांच्या मनगट्या आणि नदीपात्रात आढळलेला चिमुकलीचा मृतदेह... बीडच्या खासबाग परिसरातील या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तीन-चार दिवसांपूर्वी चिमुकलीला नदीपात्रात टाकले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 23, 2026 | 03:26 PM
वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?

वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:
  • बिंदुसरा नदीपात्रात चिमुकलीचा मृतदेह
  • गुलाबी फ्रॉक, मण्यांच्या मनगट्यांवरून ओळख पटविण्याचे प्रयत्न
  • सीसीटीव्ही तपासत पोलिसांकडून आरोपीचा शोध
 

बीड : शहरातील खासबाग परिसरातील बिंदुसरा नदीपात्रात तीन ते चार महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. चिमुकलीला तीन-चार दिवसांपूर्वी नदीपात्रात टाकण्यात आले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मासेमारी करणाऱ्या नागरिकांना प्रथम दिसला मृतदेह

नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना चिमुकलीचा मृतदेह प्रथम दिसला. मृतदेहाची स्थिती पाहून त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. मृतदेहाचे काही भाग जखमी अवस्थेत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या घटनेचे वृत्त समोर येताच परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: अबब! दारूबंदीच्या जावळीत उत्पादन शुल्क विभागानेच पकडली दारू; एकाच दिवशी आठ ठिकाणी कारवाई

पोलिसांकडून पंचनामा

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे एपीआय राठोड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तो जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

गुलाबी फ्रॉक, काळ्या-पिवळ्या मण्यांच्या मनगट्या

पोलिसांच्या प्राथमिक तपासात चिमुकलीच्या अंगावर गुलाबी रंगाचा फ्रॉक असल्याचे आढळले. तसेच तिच्या हातात काळ्या-पिवळ्या मण्यांच्या मनगट्या होत्या. या आधारे चिमुकलीची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.

हेही वाचा : Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणीचा छळ; पाठलाग, धमकी अन् घरात घुसून तरुणीवर… 

सीसीटीव्ही फुटेज तपासणार

चिमुकलीला बिंदुसरा नदीवरील पुलावरून नदीपात्रात फेकण्यात आले की कोणी नदीपात्रात उतरून तिला तेथे ठेवले, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत असून, त्यातून संशयित व्यक्ती किंवा वाहनाबाबत काही माहिती मिळते का, याचा शोध घेतला जात आहे.

घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप

एवढ्या लहान चिमुकलीचा मृतदेह नदीपात्रात आढळल्याने बीड शहरात दुःख आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या उपक्रमांतून मुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती केली जात असतानाही अशा घटना घडत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास करून चिमुकलीला नदीपात्रात टाकणाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Web Title: Beed bindusara river baby dead body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Beed Case
  • Beed crime News
  • Beed Police Latest news
  • Crime . Crime News

संबंधित बातम्या

Suicide News: “बाबांनी फोन घेऊन दिला नाही म्हणून…” नालासोपाऱ्यातील वाकणपाड्यात खळबळ; ऐन दिवाळीत तरुणानं उचललं भयंकर पाऊल!
1

Suicide News: “बाबांनी फोन घेऊन दिला नाही म्हणून…” नालासोपाऱ्यातील वाकणपाड्यात खळबळ; ऐन दिवाळीत तरुणानं उचललं भयंकर पाऊल!

Dharashiv: “पुण्याहून सणाला घरी आली अन्…” फटाक्यांच्या की शॉर्ट सर्किटच्या ठिणगीने घेतला ६ जणांचा बळी; गावकऱ्यांनी JCB ने…
2

Dharashiv: “पुण्याहून सणाला घरी आली अन्…” फटाक्यांच्या की शॉर्ट सर्किटच्या ठिणगीने घेतला ६ जणांचा बळी; गावकऱ्यांनी JCB ने…

Family Harassment: “पती-सासऱ्यांच्या शारीरिक-मानसिक त्रासाने घेतला बळी! ५ दिवसांच्या संघर्षानंतर शेवटी…
3

Family Harassment: “पती-सासऱ्यांच्या शारीरिक-मानसिक त्रासाने घेतला बळी! ५ दिवसांच्या संघर्षानंतर शेवटी…

Pub Fight Case: पुण्यात पबमधील डान्सवरून तुफान राडा! शर्ट हवेत फिरवल्याने झाला वाद; तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्…
4

Pub Fight Case: पुण्यात पबमधील डान्सवरून तुफान राडा! शर्ट हवेत फिरवल्याने झाला वाद; तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.