anjali damania target pankaja munde over beed murder case
बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. डिसेंबर महिन्यामध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याचे हृदयद्रावक फोटो देखील आता समोर आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी म्हणून समोर आला आहे. तर वाल्मिक कराडसोबत संबंध असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या देखील अडचणींमध्ये वाढ झाली. धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. धनंजय मुंडेंनंतर अंजली दमानिया यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना मंत्री पंकजा मुंडे यांनी पुण्यात पुण्याचे प्रश्न विचारा. बीडचे प्रश्न विचारु नका असे ठणकावून सांगितले होते. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली होती. यावर अंजली दमानिया यांनी देखील निशाणा साधला आहे. दमानिया म्हणाल्या की, “पंकजा मुंडे या महिला बाबत कधीच लढलेल्या दिसल्या नाहीत, फक्त टिपणी करताना दिसतात. हुंडाबळी बाबत त्या बोलतात, तर त्या स्वत: का लढत नाहीत? आम्ही सर्व महिला म्हणून त्यांना पाठिंबा देऊ. पण आता बीडचे प्रकरण त्यांच्या गळ्याशी येतंय आणि ते डायव्हर्ड करण्यासाठी त्या आता अशा बोलतात,” अशी टीका अंजली दमानिया यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
न्यायाधीश पदावर असणाऱ्या एका व्यक्तीने न्यायालयामध्ये घटस्फोट घेत असलेल्या महिलेला तिच्या दागिन्यांवर टोकले आहे. “जज असे म्हणतो, तू टिकली लावत नाही, मंगळसूत्र लावत नाहीस तर नवरा तुझ्यात रस कसा घेईल, हे ऐकून मी शॉक आहे. ही पुरुषप्रधान संस्कृतीचे असे जज असतात, त्यामुळे अशा जजला फॅमिली कोर्टातून तात्काळ बदली करावी. करण ते महिलांना न्याय देऊच शकत नाहीत,” असे स्पष्ट मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अंजली दमानिया यांनी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले याच्यावर निशाणा साधला आहे. अंजली दमानिया यांनी त्याच्या पैशांसोबत अनेक व्हिडिओ शेअर केल्या आहेत. त्या टीका करताना म्हणाल्या की, “सतीश भोसले हा अतिशय विकृत माणूस आहे. त्याने एकाला बॅटने मारले, हरण पकडत असताना एकाने विरोध केला म्हणून एकाचे दात तोडले, यावरून याची विकृती दिसते. हा पैसे उधळतो, हेलिकॉप्टरमधून उतरतो, सोनं घालताना दिसतो, अशा माणसा सोबत सुरेश धस एकत्र बसतात, हा गुन्हेगार आहे. त्यामुळे सुरेश धसाने आता पत्रकार परिषद घेऊन, त्यांची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहेत, सतीश भोसले हा एवढा पैसा आला कुठून, हे कार्यकर्ते राजकारणाच्या कार्यकर्त्यांना पोलीसांचे संरक्षण मिळतं, यातून हे घडतं, त्यामुळे युवा पिढी भरकटत आहे. सुरेश धस यांनी त्यांची भूमिका लवकर स्पष्ट करावी अन्यथा त्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी लागेल,” असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे.