अबू आझमी यांचे विधानसभेतील निलंबन मागे घेण्यासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : मागील तीन दिवसांपासून समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी हे चर्चेमध्ये आले आहेत. अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. तसेच औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. अबू आझमी यांनी माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्याचे पडसाद हे विधीमंडळामध्ये देखील पडले. सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या एकमताने अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आला आहे. हे निलंबन रद्द करण्यात यावे यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे.
समाजवादी पार्टीचे नेते आणि शिवाजीनगर मानखुर्दचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा वाईट प्रशासक नव्हता असे वक्तव्य केले होते. त्यामुळे सर्वांनी रोष व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्याच्या विधीमंडळामध्ये देखील खरपूस समाचार घेतला होता. महाराष्ट्राच्या विधीमंडळातून निलंबित करण्यात आल्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. यामधून त्यांनी निलंबन मागे घेण्याची विनंती केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अबू आझमी यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिले आहे की, सभागृहाच्या बाहेर पडताना माध्यमांचे प्रतिनिधी माझ्या मागे लागले. सभागृहाच्या बाहेर त्यांच्यासमोर अत्यंत गडबडीत माध्यमाने असा प्रश्न विचारला कि, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची औरंगजेबाशी तुलना केली. या संदर्भात मी असे म्हणालो कि, सतिशचंद्र, उद्रे तुश्के, डॉक्टर राजीव दीक्षित, डॉक्टर राम पुनियानी, अवध ओझा, मीना भार्गव यांच्या लेखाचा दाखला देत असे बोललो कि, त्यांनी मंदिरांना मदत केली.छत्रपती, संभाजी महाराज यांच्या बद्दल कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यांच्या बद्दल मी आदरच दाखवला. मी न बोललेले वक्तव्य माझ्या तोंडी घालून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला.
After being suspended from the Maharashtra Assembly over his remarks on Aurangzeb, Samajwadi Party MLA Abu Azmi has written a letter to Assembly Speaker Rahul Narwekar, requesting the revocation of his suspension pic.twitter.com/GWKxg7Sijh
— IANS (@ians_india) March 7, 2025
मी वरील इतिहास कारांचा दाखला देत असे म्हणालो कि, औरंगजेब एक उनम प्रशासक होते. औरंगजेव व छत्रपती शिवाजी किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये धर्म साठी लढाई नव्हती तर मना आणि जमीन माडी होती. मी जाती आणि धर्म यांच्या भेदभावाबाबत विश्वास ठेवीत नाही. वरील माझ्या वक्तव्यावरून हे सिद्ध होते कि, मी जे काही बोललो ते इतिहास करांच्या वक्तव्याचा आधार घेऊन बोललो. मी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या संबंधी कोणतेही आक्षेपार्ट विधान केलेले नाही, मला वरील दोन्ही महापुरुषान बाबत नितांत आदर आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणात कोणताही दोष नसल्याने माझे निलंबन कृपया मागे घेण्यात यावे बावे हि नम्र विनंती. या प्रकारणासंबंधी वरील उल्लेखित इतिहास करांचे लेख सोबत जोडले आहे, असे अबू आझमी यांनी त्यांच्या पत्रामध्ये लिहिले आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे निलंबनाची कारवाई मागे घेण्याची विनंती केली आहे.