अण्णाभाऊ साठे यांची कन्या शांताबाई साठे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे नाव आपल्या सर्वांनाचा ठाऊक आहे. आपल्या बाणेदार आवाजाने आणि धारधार शब्दाने संयुक्त महाराष्ट्राची अग्नी धगधगत ठेवण्यात अण्णाभाऊ साठेंचा मोठा वाट होता. त्यांच्या फकिरा कादंबरीने तर मराठी साहित्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. पण फकिरा कादंबरीचे लेखन ज्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले त्या शांताबाई साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठे यांच्या मुलीचे दि. 4 मे 2025 रोजी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. फकिरा कादंबरी निर्माण होतानाच्या त्या साक्षीदार होत्या. जेव्हा लागोपाठ तीन महिने अण्णाभाऊ अहोरात्र लेखन करून खाली कोसळेल तेव्हा त्यांना सावरणाऱ्या शांताबाईच होत्या.
बारामतीत १११ ‘फटाका बुलेट सायलेन्सरवर बुलडोझर; वाहतूक पोलिसांची धडक कारवाई
दि. 4 मे रोजी कांदिवलीमधील सेवन स्टार हॉस्पिटलमध्ये त्या उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. बोरिवलीमधील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या अविवाहित होत्या.
‘या’ कारणामुळे पेण बस स्थानकात प्रवाशांचे हाल ! ग्रामीण भागातील अनेक एसटी बस फेऱ्या रद्द
अण्णाभाऊंनी आपल्या आयुष्यात दोन लग्न केली. त्यांच्या दुसऱ्या पत्नी जयवंताबाई दोडके यांना दोन कन्या होत्या, शांता आणि शकुंतला. शांताबाई यांनी आयुष्यभर अविवाहित राहून कम्युनिस्ट पक्षाचे काम केले. त्यांनी अण्णाभाऊंच्या ‘अकलेची गोष्ट’ नाटकात काम केले होते. यासोबतच त्यांनी शाहीर दत्ता गव्हाणकर यांच्या ‘काय चालं न गा’ नाटकातही काम केले होते. परंतु अण्णाभाऊंची आवडती मुलगी म्हणून समाजात आणि सरकारकडून जो सन्मान त्यांना मिल्ने गरजेचे होते, तो सन्मान मिळाला नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांनी व्यक्त केली आहे.