
कळंबोलीत महायुतीचे वारे स्पष्ट
प्रभागातील प्रत्येक गल्ली आणि सोसायट्यांमध्ये जाऊन ‘डोअर-टू-डोअर’ (गृहभेट) प्रचारावर युतीच्या उमेदवारांनी भर दिला आहे.पत्रकाच्या माध्यमातून स्थानिक समस्या सोडवण्याचे आश्वासन मतदारांना दिले जात आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांसोबतच प्रभागात गेल्या काही वर्षांत झालेली रस्ते, पाणी आणि स्वच्छतेची कामे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया आणि पत्रकांचा मोठ्या प्रमाणावर वापर युतीच्या उमेदवारांकडून केला जात आहे.
Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान
सरस्वती काथारा पराभवाचा वाचपा काढणार
शेवटच्या वेळी किरकोळ अपघातात जायबंदी झाल्याने 2017 च्या निवडणूक शेकाप आघाडी कडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या सरस्वती काथारा यांचा पराभव झाला होता.पराभवाने खचून न जाता पक्षातील विजयी उमेदवारांच्या खांद्याला खांदा लावून काथारा यांनी प्रभागाच्या विकासासाठी काम केल्याने मतदारांचा मोठा पाठिंबा काथारा यांना मिळताना दिसून येत आहे.
आघाडी तर्फे उमेदवारांची शोधाशोध, अपक्ष उमेदवारांना अधिकृत उमेदवारी देण्याची विरोधकांवर नामुष्की
माजी नगरसेवक रवींद्र भगत आणि सरस्वती काथारा यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवल्याने तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष देखील भाजपा युतीत सामील झाल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विजय खानावकर, भाजपा उमेदवार माजी नगरसेविका मोनिका महानवर यांच्या विरोधात उमेदवारांची शोधाशोध करण्याची वेळ आघाडीतील पक्षांवर आली असून, अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तय्यारी केलेल्या उमेदवारांची मिन्नतवारी करून अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना आघाडी तर्फे निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे.
Panvel Municipal Corporation: पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज…
प्रभाग 9 मधील माजी नगरसेवक प्रभाग 10 मध्ये
उमेदवार मिळत नसल्याने मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून शेकाप कडून निवडणूक लढवून विजयी झालेल्या गोपाळ भगत यांना प्रभाग क्रमांक 10 मध्ये आयात करून निवडणूक लढवण्याची वेळ शेकाप वर आली आहे.परिणामी प्रभाग 9 मध्ये निवडून येऊन प्रभागात प्रभावी काम करण्यात अपयशी ठरल्याने भगत यांना प्रभाग 10 या त्यांच्या मूळ गावाचा समावेश असलेल्या प्रभागात आयात करण्यात आल्याची टीका विरोधक करत आहेत.