Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… अन्यथा हातात बंदुका घेऊ”; विरोधी कृती समितीचा ‘शक्तिपीठ’ महामार्गावरून सरकारला इशारा

कुणाची ही मागणी नसताना ठेकेदार आणि आमदार खासदारांना पोसण्यासाठी हा महामार्ग होत आहे,  त्यामुळे याला आमचा विरोध आहे, अशी भूमिका शक्तिपीठ विरोधी कृती समितीने घेतली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 18, 2025 | 09:49 PM
“… अन्यथा हातात बंदुका घेऊ”; विरोधी कृती समितीचा ‘शक्तिपीठ’ महामार्गावरून सरकारला इशारा
Follow Us
Follow Us:
सांगली:  पवनार वर्धा ते पत्रादेवी गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भू संपादन हरकती च्या नोटीस शेतकऱ्यांना बजावण्यास प्रारंभ झाला आहे त्या नोटीसीचे दहन गुरुवारी स्टेशन चौकात करण्यात आले यावेळी शासनाच्या विरोधात बोंब ही ठोकण्यात आले.शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा शक्तिपीठ रद्द न केल्यास हातात बंदूका घेऊ असा  इशारा महेश खराडे यांनी दिला.
सदर आंदोलन शक्तिपीठ विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आले. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, रद्द करा, रद्द करा शक्तिपीठ महामार्ग बंद करा, शेतकरी विरोधी सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणानी परिसर दणाणून सोडण्यात आला.

यावेळी महेश खराडे म्हणाले, ” विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीत करणारच अशी भूमिका घेतली आहे.  त्यामुळेच आता माधवनगर बुधगांव कर्नाळ आदी गावातील शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यास प्रारंभ झाला आहे,  त्यामुळे शेतकऱ्याच्यात संताप निर्माण झाला आहे त्यामुळेच आम्ही त्या नोटीसीचे दहन करण्यात आले. पण आम्ही केवळ दहन करून थांबणार नाही. तर प्रसंगी हातात शस्त्र घेऊ पण एक इंच ही जमीन देणार नाही.

Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’ला विरोध वाढला; कोल्हापुरात मूक मोर्चा; केली ‘ही’ मोठी मागणी

खराडे म्हणाले, ” महामार्ग हे विकासाचे मोठे साधन आहे. यात दुमत नाही पण जे महामार्ग गरजेचे आहेत ते करा, त्याला आमचा विरोध नाही, शक्तिपीठ महामार्ग हा रत्नागिरी विजापूर महामार्गला समांतर च महामार्ग आहे, रत्नागिरी विजापूर रस्त्यावर पुरेशी वाहने नाहीत.  आवश्यक तेवढा टोल त्या रस्त्यावर गोळा होत नाही ;  मग हा महामार्ग कशासाठी? कोणत्या भाविकाची मागणी नाही, वाहन धारकांची मागणी नाही, कुणाची ही मागणी नसताना ठेकेदार आणि आमदार खासदारांना पोसण्यासाठी हा महामार्ग होत आहे,  त्यामुळे याला आमचा विरोध आहे.
याशिवाय यात भ्रष्टाचार ही प्रचंड आहे. राष्ट्रीय महामार्गगाचे एक कि मी चा खर्च ३५ कोटी आहे ;  तर या महामार्गचा १०७ कोटी आहे, हा सर्व पैसा ठेकेदार आमदार खासदारांना वाटप होणार आहे, त्यामुळे रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत आम्ही लढा चालू ठेवणार यावेळी प्रवीण पाटील,  उमेश एडके, रघुनाथ पाटील, भालचंद्र आंबोळे, राजेश एडके, राजेश पाटील, अधिक पाटील, विलास थोरात, मुरलीधर निकम, प्रशांत पाटील, श्रीकांत पाटील, अनिल कोकाटे, मयूर पाटील, सुनील पाटील आदिसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Anti shaktipeeth action committee warn to government about shaktipeeth expressway project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • kolhapur
  • Maharashtra Government
  • Shaktipeeth Expressway

संबंधित बातम्या

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
1

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
2

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
3

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त
4

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.