Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Antyodaya Saree Scheme : अंत्योदय योजनेतील साड्यांचा निकृष्ट दर्जा; महिलांनी नेसण्याऐवजी कुंपणाला लावल्या

Antyodaya Saree Scheme :अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक गरजू आणि आदिवासी महिलांसाठी शासनाकडून वितरीत करण्यात आलेल्या मोफत साड्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कापड अत्यंत पातळ आणि तकलादू असल्याने महिलांनी या साड्या नेसण्याऐवजी पिकांच्या संरक्षणासाठी थेट शेताच्या कुंपणाला लावल्या आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 07, 2026 | 11:28 AM
अंत्योदय योजनेतील साड्यांचा निकृष्ट दर्जा ( सौजन्य - सोशल मीडिया )

अंत्योदय योजनेतील साड्यांचा निकृष्ट दर्जा ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • नेसण्याऐवजी शेताच्या कुंपणावर!
  • अंत्योदय योजनेतील साड्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट
  • साडी खरेदीतील गैरव्यवहाराची चौकशी होणार?
Antyodaya Saree Scheme :  शासन विविध योजना राबवत असतं. आताही महिन्यांसाठी खास योजना राबवली आहे. शासनामार्फत अत्याला शिधापत्रिकाधारका मार्फत गरजू महिलांसाठी वितरित केल्या जातात. त्याबाबत आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वितरीत होणाऱ्या या मोफत साड्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या साड्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याने ग्रामीण व आदिवासी भागांतील लाभार्थी महिलांनी त्या नेसण्याऐवजी शेतातील पिके आणि भाजीपाल्याचे भटक्या जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी कुंपणाला बांधल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ( Antyodaya Saree Scheme ) 

Farmers Crop Loan Issue : कागदपत्रांवर सह्या घेतल्या कर्ज दिलंच नाही! खोडाळा आदिवासी सेवा सोसायटीतील शेतकरी संतप्त, पोलिसांत धाव

शासनाकडून मिळालेल्या साड्यांचे कापड अत्यंत पातळ, तकलादू असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. या नियमित वापरासाठी अजिबात योग्य नसून, त्यावर फॉल, पिको आणि ब्लाऊज शिवण्यासाठी होणारा अतिरिक्त खर्चही वाया जात असल्याची तीव्र नाराजी महिलांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महिलांनी या साड्यांचा वापर थेट शिवारातील कुंपणावर केल्याने योजनेच्या अंमलबजावणीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

‘भूमिपुत्र एल्गार’चे मुख्यमंत्र्यांना निवेदन

या गंभीर गैरप्रकाराविरोधात भूमिपुत्र एल्गार संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन सादर करून या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. गरीब आणि आदिवासी महिलांना आधार देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या कल्याणकारी योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गुणवत्ता तपासणी का केली जात नाही?

शासनाच्या कोट्यवधी रुपयाच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या साड्यांची तांत्रिक गुणवत्ता तपासणी (क्यालिटी टेस्ट) का करण्यात आली नाही? असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. साडी खरेदी प्रक्रियेतील निविदा, गुणवत्ता तपासणी, पुरवठादार कंपन्या आणि जबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून अहवाल जाहीर करावा, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रमोद पवार यांनी केली आहे. आता या प्रश्नावर शासन काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल.

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर

Web Title: Antyodaya scheme free saree quality issues and complaint marathi news ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Government Scheme
  • palghar

संबंधित बातम्या

Farmers Crop Loan Issue : कागदपत्रांवर सह्या घेतल्या कर्ज दिलंच नाही! खोडाळा आदिवासी सेवा सोसायटीतील शेतकरी संतप्त, पोलिसांत धाव
1

Farmers Crop Loan Issue : कागदपत्रांवर सह्या घेतल्या कर्ज दिलंच नाही! खोडाळा आदिवासी सेवा सोसायटीतील शेतकरी संतप्त, पोलिसांत धाव

Vadhavan Port Protest : भर उन्हात ५०० हून अधिक पोलीस अन् हजारो भूमिपुत्र आमनेसामने! वाढवण बंदरविरोधात वरोरमध्ये आंदोलन पेटले
2

Vadhavan Port Protest : भर उन्हात ५०० हून अधिक पोलीस अन् हजारो भूमिपुत्र आमनेसामने! वाढवण बंदरविरोधात वरोरमध्ये आंदोलन पेटले

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर
3

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर

Mira-Bhayandar News: घंटागाड्या खरेदी करून वर्षानुवर्षे वापराविना; घोडबंदर डेपोत दुरवस्था
4

Mira-Bhayandar News: घंटागाड्या खरेदी करून वर्षानुवर्षे वापराविना; घोडबंदर डेपोत दुरवस्था

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.