
Sharad Pawar Wealth: बारामती ते दिल्ली.. 85 वर्षांचे पवार… आणि 'इतक्या' कोटींची संपत्ती.; आकडा ऐकून तुम्ही व्हाल थक्क!
Jayant Patil News Marathi: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. याचदरम्यान आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून विरोधी पक्षातील विशेष नेत्यांना खास पाठिंबा मिळाला असल्याचे समोर आलंय. कारण महाआघाडीतील मंत्र्यांच्या पीए, पीएस आणि ओएसडीनंतर आता शरद पवार यांच्या सरकारच्या दोन्ही आमदारांनाही सरकारी पीए दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हे दोन आमदार महायुतीच्या संपर्कात आहेत का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही महत्त्वाचे नेते आमदार जयंत पाटील आणि उत्तम जानकर यांच्या सेवेत चक्क सरकारी अधिकारी देण्यात असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सेवेत सरकारचे दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्याचं कळतंय.
जयंत पाटलांकडे उद्योग,ऊर्जा आणि कामगार विभागाचे सहाय्यक कक्ष अधिकारी गौरव भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. तर उद्योग विभाग कक्ष अधिकारी संजय पाटील हे देखील जयंत पाटलांच्याच सेवेत असणार आहे. हे दोन्ही अधिकारी सरकारकडून पगार घेणार असले तरी ते जयंत पाटलांच्या दिमतीला असणार आहेत.
विशेषतः, अजित पवार यांचे राष्ट्रवादी राज्यमंत्री इंद्रनील नाईकांकडून यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळाली. शरद पवारांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना आणि अजित पवारांच्या मंत्र्यांना विशेष वागणूक का दिली जातेय? असा प्रश्न उपस्थित होतो.
जयंत पाटलांसोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि ईव्हीएमविरोधात आंदोलन उभं करणाऱ्या उत्तम जानकरांनाही सरकारकडून स्पेशल ट्रिटमेंट दिली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. कारण उत्तम जानकर यांच्या सेवेत सरकारच्या ग्रामीण विकास अधिकाऱ्यांनी त्यांना वैयक्तिक सहाय्यक म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळं शरद पवारांच्या पक्षातील आमदारांवर सरकार का मेहेरबान? असा सवाल आता विचारला जातोय.
दरम्यान सध्या जयंत पाटील आणि भाजप मंत्री जरी यावर बोलण्याचे टाळत असतील तरी उसणवारी तत्त्वावर या नेमणुका झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्र देतायेत आहे. त्यामुळे आधीच जयंत पाटील भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यांच्या जवळ एक विशेष सरकारी अधिकारी तैनात करण्यात आला आहे, मग याचा अर्थ काय? हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, तूर्तास तरी सरकारी स्तरावरुन कुणीच याच्यावर बोलायला तयार नाही.