स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या (फोटो - टीम नवराष्ट्र)
पुणे : पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. पुण्यातील स्वारगेट या बसस्थानकामध्ये उभ्या असणाऱ्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. दत्तात्रय गाडे असे या नराधमाचे नाव असून घटना होऊन 50 तास उलटून गेले तरी तो अद्याप पोलिसांच्या हाती न आल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
पुणे पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याचा जोरदार तपास सुरु केला आहे. यासाठी पोलिसांची 11 पथके या आरोपीचा शोध घेत आहेत. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील स्वारगेट बसस्थानकाची पाहणी करुन आढावा घेतला आहे. तसेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत चर्चा करुन पत्रकार परिषद घेतली आहे. यानंतर आता आरोपी दत्तात्रय गाडे यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दत्तात्रय गाडे याचे शेवटचे लोकेशन समोर आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
स्वारगेट बस आगारामध्ये पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी दत्तात्रय गाडे गुन्हा केल्यानंतर बसने त्याच्या शिरूर तालुक्यातील गुनाट गावी आला. सकाळी 11 वाजता तो घरी आला. घरी आल्यावर त्याने शर्ट बदलला. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता गुन्हा दाखल झाल्यावर तो फरार झाला. पीडित मुलीने सकाळी 9 च्या सुमारास तक्रार दाखल केली. त्याचे शेवटचे लोकेशन शिरुर असल्याचे मोबाईलवरुन दिसून आले. त्यानंतर बाहेर पडला.
दत्तात्रय गाडे हा आता फरार असून पोलीस कसून त्याचा तपास करत आहेत. पोलिसांकडून दत्तात्रय गाडे याचे फोटो फिरवले जात असून सापडून देणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपयांचे बक्षिस देखील जाहीर करण्यात आले आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा ऊसाच्या शेतामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर पुणे शहर पोलिसांकडून ड्रोनद्वारे ऊस शेतामध्ये त्याचा शोध सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या घरात आरोपी दत्तात्रय गाडे हा पाणी पिण्यासाठी आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता दत्तात्रय गाडे याचा ड्रोनच्या सहाय्याने तपास सुरु असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजकीय कनेक्शनचा आरोप
आरोपी दत्तात्रय गाडे याचा शिरुर हवेली विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माऊली कटके यांच्या फ्लेक्सवर फोटो असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आरोपी गाडे हा आमदार माऊली कटके यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होत होता. याबाबत आता आमदार कटके यांनी स्पष्टीकरण दिले. मतदारसंघ हा अतिशय मोठा आणि विस्तृत आहे. मतदार संघातील कामानिमित्त अनेक लोक मला भेटत असतात. त्या आरोपीशी माझा कुठलेही संबंध नाही. त्याला फाशी द्या अशी मागणी आमदार माऊली कटके यांनी केली आहे.