Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी शायना एन. सी यांची नियुक्ती, संजय मोरे यांच्याकडून प्रसिद्धी पत्रक जारी

शिवसेना नेत्या शायना एनसी यांची पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 05, 2025 | 01:12 PM
शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी शायना एन. सी यांची नियुक्ती, संजय मोरे यांच्याकडून प्रसिद्धी पत्रक जारी

शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी शायना एन. सी यांची नियुक्ती, संजय मोरे यांच्याकडून प्रसिद्धी पत्रक जारी

Follow Us
Follow Us:

मुंबई : फॅशन जगतातून बाहेर पडून राजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या शायना एनसी आता एका नवीन भूमिकेत दिसणार आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्या असलेल्या शायना एनसी त्यांची आता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी पक्षाने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये असे म्हटले आहे की, ही नियुक्ती शिवसेना प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी शायना एन.सी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना पक्ष सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे म्हटले आहे. मागील दोन दशकांहून अधिक काळ मुंबई आणि राष्ट्रीय राजकारणात शायना एन.सी सक्रीय आहेत. विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये शायना एन.सी यांनी त्यांनी शिवसेनेकडून दक्षिण मुंबईतील मुंबादेवी मतदार संघातून निवडणूक लढली होती.

लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापणार; आक्रमक महिलांचा थेट उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, फॅशन डिझायनरमधून राजकारणी बनलेल्या शायना एनसी यांना एक वर्षासाठी या नवीन पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शायना एनसी शिवसेनेपूर्वी भारतीय जनता पक्षात होत्या, त्या २०२४ मध्ये भाजपमध्ये सामील झाल्या. त्यांना राजकारणात आणण्याचे श्रेय दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना जाते आणि त्या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याही राहिल्या आहेत. त्यांना महाराष्ट्र युनिटचे कोषाध्यक्ष देखील बनवण्यात आले होते.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शायना एन.सी यांना राष्ट्रीय प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही नियुक्ती एक वर्षासाठी असेल असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करून सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत असे पक्षाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

शायना एनसी यांचा राजकीय प्रवास

शायना एनसी जवळपास २० वर्षे भाजपमध्ये होत्या, ज्यांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडला आणि त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेशी हातमिळवणी केली. ज्यामध्ये सत्ताधारी महायुती आघाडीने महाराष्ट्रात प्रचंड बहुमताने सत्ता कायम ठेवली. शायना एनसीने २०२४ ची विधानसभा निवडणूक मुंबादेवी मतदारसंघातून लढवल्या होत्या मात्र त्यांना पराभव पत्कारावा लागला.

गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले

शायना एनसीचे नाव सर्वात वेगवान साडी परिधान केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. तिने अनेक सामाजिक कार्ये देखील केली आहेत. तिने तिचे शालेय शिक्षण क्वीन मेरी स्कूल, मुंबई येथून घेतले आणि त्यानंतर तिने सेंट झेवियर्स कॉलेजमधून राज्यशास्त्राची पदवी पूर्ण केली. त्यानंतर तिने फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केला.

राजकीय पक्षांची चिंता वाढणार? मनोमिलनाला आव्हान देणार तिसरी आघाडी; नाराजांच्या बंडखोरीची शक्यता

Web Title: Appointment of shayna n c as the national spokesperson of shiv sena press release issued by sanjay more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

‘ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना…’; DCM एकनाथ शिंदेंचे गती देण्याचे निर्देश
1

‘ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना…’; DCM एकनाथ शिंदेंचे गती देण्याचे निर्देश

शिरसाट- सत्तार यांच्यात अखेर दिलजमाई; एकाच गाडीतून दोघेही बँकेत झाले दाखल
2

शिरसाट- सत्तार यांच्यात अखेर दिलजमाई; एकाच गाडीतून दोघेही बँकेत झाले दाखल

Water Crisis : पाणीटंचाईने नागरिक हैराण; मिरा-भाईंदरमध्ये पाणीप्रश्नी शिवसेनेचा इशारा, ९ जूनला महिलांचा ‘टमरेल मोर्चा’
3

Water Crisis : पाणीटंचाईने नागरिक हैराण; मिरा-भाईंदरमध्ये पाणीप्रश्नी शिवसेनेचा इशारा, ९ जूनला महिलांचा ‘टमरेल मोर्चा’

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला धक्का? उमेदवाराच्या माघारीनंतर सोनललक्ष्मी घाग यांची तीव्र प्रतिक्रिया
4

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला धक्का? उमेदवाराच्या माघारीनंतर सोनललक्ष्मी घाग यांची तीव्र प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.