Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोप-प्रत्यारोप बंद करा, शेतकऱ्यांच्या मदतीला जा! एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश

मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना राजकीय वाद बाजूला ठेवून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरण्याचे निर्देश दिले आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 24, 2026 | 09:01 PM
Eknath Shinde

Eknath Shinde

Follow Us
Follow Us:
  • ऑडिओ क्लिपमुळे भाजप-शिंदेसेनेत वाद
  • शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळतेय का? प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश
  • ‘बळीराजाची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही’, शिंदेंचा शब्द
 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपनंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद आणखी वाढल्याचं चित्र आहे. या क्लिपमधील दाव्यांवरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. असं असतानाच, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. राजकीय वादात अडकून न पडता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

ऑडिओ क्लिपमध्ये मनोज जरांगे पाटील यांना मॅनेज करण्यासाठी 500 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा आरोप करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या आरोपांमध्ये श्रीकांत शिंदे यांचं नावही घेतलं जात आहे.

या प्रकरणावरून भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना शिंदेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीत बळीराजाला मदतीची गरज असून, अशा वेळी राजकीय वादापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची असल्याचा संदेश या निर्देशांतून देण्यात आला आहे.

Sanjay Gaikwad : महायुतीत पुन्हा ठिणगी! संजय गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल! ‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे आमदार घरी बसले असते’

साडेतीन लाख धान्य किट घराघरांत पोहोचवा

दसऱ्याच्या मुहूर्तावर दुष्काळग्रस्त भागांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून साडेतीन लाख धान्य किट पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. ही मदत केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचली पाहिजे, यावर भर देण्यात आला आहे.

सरकारकडून जाहीर होणाऱ्या मदतीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळतोय की नाही, याची कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

अर्ज आणि पंचनाम्यांसाठी शिवसैनिकांनी मदत करावी

शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवताना अनेकदा अर्ज, कागदपत्रं आणि पंचनाम्यांच्या प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. या कामात शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून प्रशासकीय प्रक्रियेत सहकार्य करावं, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

‘बळीराजाची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही,’ हा दिलेला शब्द पाळण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावं, असं आवाहनही करण्यात आलं आहे. आता राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांपर्यंत मदत कितपत पोहोचते, याकडे लक्ष लागलं आहे.

Maharashtra Politics: भाजप-शिंदे गटात मतभेद? बिलो टेंडरच्या मुद्द्यावर नंदकिशोर परब यांचं स्पष्टीकरण

💡

Frequently Asked Questions

  • Que: एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना काय आदेश दिले?

    Ans: राजकीय आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यावर लक्ष केंद्रित करा, असे निर्देश त्यांनी दिल्याचं वृत्त आहे. शासकीय मदत पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतेय का, याची पाहणी करण्यावरही भर देण्यात आला आहे.

  • Que: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी किती धान्य किट पाठवण्यात आल्या?

    Ans: दसऱ्याच्या मुहूर्तावर दुष्काळग्रस्त भागांसाठी साडेतीन लाख धान्य किट पाठवण्यात आल्या आहेत. त्या गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

  • Que: मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपमुळे वाद का निर्माण झाला?

    Ans: ऑडिओ क्लिपमधील आरोपांमुळे भाजप आणि शिंदेसेनेतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं वृत्त आहे.

Web Title: Eknath shinde orders shiv sena leaders help drought affected farmers vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

Sanjay Gaikwad : महायुतीत पुन्हा ठिणगी! संजय गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल! ‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे आमदार घरी बसले असते’
1

Sanjay Gaikwad : महायुतीत पुन्हा ठिणगी! संजय गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल! ‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे आमदार घरी बसले असते’

Maharashtra Politics: भाजप-शिंदे गटात मतभेद? बिलो टेंडरच्या मुद्द्यावर नंदकिशोर परब यांचं स्पष्टीकरण
2

Maharashtra Politics: भाजप-शिंदे गटात मतभेद? बिलो टेंडरच्या मुद्द्यावर नंदकिशोर परब यांचं स्पष्टीकरण

Manoj Jarange Audio Clip Row : ‘फडणवीस, शिंदे आणि जरांगे… बाकी सगळे एक्स्ट्रा!’ म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल
3

Manoj Jarange Audio Clip Row : ‘फडणवीस, शिंदे आणि जरांगे… बाकी सगळे एक्स्ट्रा!’ म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप
4

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.