Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Audio Clip Row : ‘फडणवीस, शिंदे आणि जरांगे… बाकी सगळे एक्स्ट्रा!’ म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल

Manoj Jarange Audio Clip Row : मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. 500 कोटींच्या कथित व्यवहारावरून खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यावर भाष्य करत भाजपच्या कोअर टीमवरही गंभीर आरोप केले.

  • By विवेक
Updated On: Oct 24, 2026 | 05:25 PM
Sanjay Raut

Sanjay Raut

Follow Us
Follow Us:
  • 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर संजय राऊतांचा हल्लाबोल
  • फडणवीसांच्या चौकशीवर राऊतांनी उपस्थित केले प्रश्न
  • भाजपच्या कोअर टीमवर राऊतांचा गंभीर आरोप
 

Manoj Jarange Audio Clip Row : मनोज जरांगे पाटील यांनी फोडलेल्या ऑडिओ बॉम्बमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात बरीच खळबळ उडाली आहे. जरांगे पाटलांना मॅनेज करण्यासाठी एकनाथ शिंदेनी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले असल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमधून करण्यात येत आहे. यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप नेत्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. यावरूनच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राऊतांनी भाजप – शिंदे गटाच्या नेत्यांवर चांगलीच आगपाखड केली. “या नाट्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे हि तीन महत्त्वाची पात्रं आहेत, बाकी सगळे एक्स्ट्रा आहेत,” असे म्हणत त्यांनी भाजप – शिंदे गटाच्या नेत्यांच्या आरोप – प्रत्यारोप नाट्यावर निशाणा साधला.

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचा उल्लेख करत राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर निशाणा साधला. ‘या नाट्यात तीन महत्त्वाची पात्रं आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे. बाकी सगळे एक्स्ट्रा आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप

SIT चौकशीवरून फडणवीसांना सवाल

या प्रकरणात विशेष तपास पथकाची (SIT) चौकशी जाहीर करण्याच्या प्रक्रियेवरही राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले. आधी गुन्हा दाखल करून त्यानंतर SIT स्थापन का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला.

‘पाचशे कोटी ही काही लहान रक्कम नाही. या प्रकरणाची नीट चौकशी होईल का?’ असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी तपासाच्या निष्पक्षतेबाबत शंका व्यक्त केली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली.

भाजपच्या कोअर टीमवर गंभीर आरोप

राऊत यांनी या संभाषणामागे भाजपच्या कोअर टीममधील व्यक्ती असल्याचा दावा केला. तसेच भाजपच्या एका विधान परिषद आमदाराचा संदर्भ देत त्यांनी नाव न घेता टीका केली. माझ्या माहितीनुसार हे भाजपच्या विधान परिषदेच्या आमदाराने केलंय. तुम्ही त्याचे फार लाड केले ते अंगलट आलंय आता… केंद्रातील सरकार पडणार याची खात्री पटतेय आता..”

फोन टॅपिंगवरूनही राजकीय संघर्ष

“टेप कुणी फोडली? भाजपचे अंतर्गत संभाषण रेकॅार्ड होतं म्हणजे गृहखातं तुमच्या विरोधात गेलय.. आमचे फोन टॅप करायचे आता तुमचेच लोक तुमचेच फोन टॅप करतायत,”’ असं म्हणत राऊत यांनी फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला.

या प्रकरणामुळे भाजप आणि शिंदे गटातील संबंधांबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या राजकारणात पुढे कोणती नवी माहिती समोर येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Manoj Jarange Audio Clip Row : ‘माझ्यापर्यंत पैसे आलेच नाहीत!’ 500 कोटींच्या दाव्यावर Shrikant Shinde यांचा मिश्किल टोला

💡

Frequently Asked Questions

  • Que: 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर संजय राऊत काय म्हणाले?

    Ans: संजय राऊत यांनी या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचा उल्लेख करत राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर टीका केली. त्यांनी SIT चौकशीच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले.

  • Que: संजय राऊत यांनी SIT चौकशीबाबत कोणते प्रश्न उपस्थित केले?

    Ans: राऊत यांनी आधी गुन्हा दाखल करून नंतर SIT स्थापन का करण्यात आली नाही, असा सवाल केला. तपासाच्या निष्पक्षतेबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली.

Web Title: Manoj jarange audio clip row sanjay raut slams devendra fadnavis eknath shinde vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Manoj Jarange Patil
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप
1

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप

Manoj Jarange Audio Clip Row : ‘माझ्यापर्यंत पैसे आलेच नाहीत!’ 500 कोटींच्या दाव्यावर Shrikant Shinde यांचा मिश्किल टोला
2

Manoj Jarange Audio Clip Row : ‘माझ्यापर्यंत पैसे आलेच नाहीत!’ 500 कोटींच्या दाव्यावर Shrikant Shinde यांचा मिश्किल टोला

Maharashtra Agniveer Police Recruitment: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: २८२ अग्निवीर पोलीस कॉन्स्टेबलपदी नियुक्ती
3

Maharashtra Agniveer Police Recruitment: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: २८२ अग्निवीर पोलीस कॉन्स्टेबलपदी नियुक्ती

जरांगेच्या ऑडिओ बॉम्बवरून महायुतीत पळापळ! भाजप – शिंदेसेनेमध्ये चांगलीच जुंपली, रामदास कदमांच्या आरोपांवरून Pravin Darekar भडकले
4

जरांगेच्या ऑडिओ बॉम्बवरून महायुतीत पळापळ! भाजप – शिंदेसेनेमध्ये चांगलीच जुंपली, रामदास कदमांच्या आरोपांवरून Pravin Darekar भडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.