Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गडचिरोली येथे मेडिकल कॉलेजला मंजुरी, पहिल्याच दौऱ्यात मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांची घोषणा

जिल्ह्यातील रुग्णांना प्रभावी उपचार यंत्रणा मिळावी, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळावी. याकरिता आमदार डॉ. देवराव होळी यांनी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून गडचिरोलीच्या पहिल्याच दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकल कॉलेजला मंजुरी दिली आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 13, 2022 | 03:55 PM
Approval for Medical College at Gadchiroli, announcement by Chief Minister and Deputy Chief Minister on their first visit

Approval for Medical College at Gadchiroli, announcement by Chief Minister and Deputy Chief Minister on their first visit

Follow Us
Close
Follow Us:

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) सुरू करण्याची[blurb content=””] घोषणा (Announcement) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केली आहे. यामुळे, आमदार डॉ. देवराव होळी (MLA Dr. Devrao Holi) यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज मंजूर करण्याच्या मागणीसाठी आमदार डॉ. होळी यांनी सातत्याने शासनाशी पत्रव्यवहार, बैठका, मंत्र्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली. मध्यंतरीच्या काळामध्ये मेडिकल कॉलेज ऐवजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (Super Specialty Hospital) उभारण्याचा महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्ना विरोधात डॉ. होळी यांनी ठाम भूमिका मांडली होती. प्रथमतः जिल्ह्यात मेडिकल कॉलेज मंजूर करा. त्यानंतरच सुपर स्पेशालिटीचा विचार करण्यात यावा, यासंदर्भात शासनाकडे आग्रह धरून पत्रव्यवहार केला. त्यावेळी महाविकास आघाडीने दुर्लक्ष केले. परंतु, आता सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकारने मेडिकल कॉलेज मंजुरीचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय असल्याचे मत डॉ. होळी यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील रुग्णांना लहान-सहान उपचारासाठी नागपूर – चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेज (Nagpur – Medical College at Chandrapur) किंवा खाजगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते. या शहरांचे अंतर अधिक असल्यामुळे अनेक रुग्णांना प्रवासादरम्यानच जीव गमवावा लागला आहे. दुर्गम भागातून अनेक रुग्णांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात येते. परंतु, रुग्णालयात सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे अनेक रुग्णांना इतर ठिकाणी रेफर करावे लागत आहे. जिल्ह्यातील रुग्णांना प्रभावी उपचार यंत्रणा मिळावी, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळावी. याकरिता आमदार डॉ. देवराव होळी यांनी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून गडचिरोलीच्या पहिल्याच दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकल कॉलेजला मंजुरी दिली आहे. याबद्दल आमदार डॉ. देवराव होळी यांनी त्यांचे आभार मानले आहे.

आमदार डॉ. होळी यांचा सत्कार

आमदार डॉ. देवराव होळी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. याबद्दल भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. देवराव होळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत सत्कार केला. यावेळी पारडीचे माजी सरपंच संजय निखारे, माजी पंस उपसभापती विलास दशमुखे,  माजी नगरसेवक चंद्रशेखर भडांगे, तालुका महामंत्री दिनेश आकरे, युवा मोर्चाचे शहर महामंत्री राजू शेरकी उपस्थित होते.

Web Title: Approval for medical college at gadchiroli announcement by chief minister and deputy chief minister on their first visit nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2022 | 03:55 PM

Topics:  

  • Chief Minister Eknath Shinde
  • Deputy Chief Minister Devendra Fadnavis
  • Gadchiroli News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.