Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Devendra Fadnavis: व्याघ्र भ्रमणमार्गाच्या अटींमुळे विकासकामे…; फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

CM Devendra Fadnavis: एमआयडीसीने बांबू लागवडीसाठी जागा भाडेतत्त्वावर घेऊन शेतकऱ्यांना वार्षिक भाडे द्यावे आणि त्या माध्यमातून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प उभारावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 18, 2026 | 02:35 AM
मुख्यमंत्री फडणवीस यांचे वनविभागाला निर्देश 

मुख्यमंत्री फडणवीस यांचे वनविभागाला निर्देश 

Follow Us
Follow Us:
  • गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालयासह अन्य विकासकामांनाही गती मिळणार 
  • मुख्यमंत्री फडणवीस यांचे वनविभागाला निर्देश 
  • बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीवर भर दिला  जाणार 
CM Devendra Fadnavis: गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत. प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्ग नसलेल्या क्षेत्रात परवानग्यांचा आग्रह धरून विकासकामांना अडथळा न करता रखडलेल्या प्रकल्पांना तातडीने गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय व रस्ते प्रकल्पांना गती

गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्गात येत नसल्याने या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कामकाज तात्काळ मार्गी लावावे. त्याचबरोबर, २८ किलोमीटरच्या महामार्गापैकी केवळ २ ते ३ किलोमीटरचा भाग व्याघ्र भ्रमणमार्गात येत असल्यास संपूर्ण महामार्गाचे काम थांबविणे योग्य नाही. त्यामुळे उर्वरित भागातील काम तातडीने सुरू करावे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या ३२ अधिकृत व्याघ्र भ्रमणमार्गांचेच निकष ‘परिवेश’ (PARIVESH) पोर्टलवर लागू करावेत. तसेच जुन्या रस्त्यांचे डांबरीकरण आणि रुंदीकरण करताना अनावश्यक अडथळे निर्माण करू नयेत, असेही निर्देश त्यांनी दिले.

Niti Aayog : नीती आयोगाच्या क्रमवारीत गडचिरोली देशात अव्वल; ‘या’ गोष्टीत आगेकूच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना

मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासोबतच वनालगतच्या शेतकऱ्यांना शाश्वत रोजगार आणि उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र वन विकास महामंडळ आणि एमआयडीसी यांच्या समन्वयातून बांबू लागवड व त्यापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येईल असे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गडचिरोली बनतंय देशाच्या विकासाचं नवं केंद्र! परिवर्तनाची गाथा देशभर पोहोचवा! फडणवीसांचे आवाहन

संरक्षित क्षेत्रालगत मोठ्या वृक्षांची तोड थांबवून बांबू लागवडीला प्राधान्य द्यावे. उसाच्या तुलनेत बांबूला निम्मे पाणी लागते आणि त्यापासून इथेनॉल निर्मितीची मोठी क्षमता आहे. एमआयडीसीने बांबू लागवडीसाठी जागा भाडेतत्त्वावर घेऊन शेतकऱ्यांना वार्षिक भाडे द्यावे आणि त्या माध्यमातून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प उभारावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सामूहिक वनहक्क समित्यांचा कार्यकाळ ग्रामपंचायतीशी सुसंगत ठेवा

राज्यातील १८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र सामूहिक वनहक्कांतर्गत येते. या क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी स्थापन होणाऱ्या समित्यांचा कार्यकाळ निश्चित करावा. ग्रामसभेने स्थापन केलेल्या सामूहिक वनहक्क समित्यांचा कार्यकाळ संबंधित ग्रामपंचायतीच्या कार्यकाळाशी सुसंगत (Co-terminus) असावा. तसेच तेंदूपत्ता आणि अन्य गौण वनोपजाच्या लिलावासाठी पारदर्शक, शास्त्रीय व निश्चित कार्यपद्धती (SOP) तयार करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणते निर्देश दिले?

    Ans: गडचिरोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांमुळे रखडू नयेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

  • Que: व्याघ्र भ्रमणमार्गातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका मांडली?

    Ans: २८ किलोमीटरच्या महामार्गापैकी केवळ २ ते ३ किलोमीटरचा भाग व्याघ्र भ्रमणमार्गात येत असल्यास संपूर्ण महामार्गाचे काम थांबवू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Web Title: Cm devendra fadnavis forest department gadchiroli tiger area development tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Forest Department
  • Gadchiroli News

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash : ‘अजितदादांचा अपघात की घातपात?’ भास्कर जाधवांचा सरकारला सवाल, मफलर मॅनवरून उपस्थित केले प्रश्न
1

Ajit Pawar Plane Crash : ‘अजितदादांचा अपघात की घातपात?’ भास्कर जाधवांचा सरकारला सवाल, मफलर मॅनवरून उपस्थित केले प्रश्न

Gadchiroli News : गडचिरोलीत कौशल्य विकास अकादमीचे मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन; युवकांना जागतिक संधी!
2

Gadchiroli News : गडचिरोलीत कौशल्य विकास अकादमीचे मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन; युवकांना जागतिक संधी!

NCP on Rohit Pawar : ‘मफलर मॅन’वरून दोन्ही राष्ट्रवादीत मतभेद? फडणवीसांना बदनाम करू नका, अजित पवार गटाची रोहित पवारांवर टीका
3

NCP on Rohit Pawar : ‘मफलर मॅन’वरून दोन्ही राष्ट्रवादीत मतभेद? फडणवीसांना बदनाम करू नका, अजित पवार गटाची रोहित पवारांवर टीका

Shirdi Taaj Five star Hotel : साईभक्तांसाठी मोठी बातमी! शिर्डीत उभारले जाणार पंचतारांकित ताज हॉटेल
4

Shirdi Taaj Five star Hotel : साईभक्तांसाठी मोठी बातमी! शिर्डीत उभारले जाणार पंचतारांकित ताज हॉटेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.