Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : महाप्रसादातून सुमारे 800 जणांना विषबाधा; 187 जणांवर उपचार सुरु

मध्यरात्रीनंतर हा आकडा वाढत गेला. बुधवार सायंकाळपर्यंत सुमारे जिल्ह्यातील विविध शासकीय तसेच खासगी रुग्णालयात सुमारे ८०० जणांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 06, 2025 | 07:57 AM
Kolhapur News : महाप्रसादातून सुमारे 800 जणांना विषबाधा; 187 जणांवर उपचार सुरु

Kolhapur News : महाप्रसादातून सुमारे 800 जणांना विषबाधा; 187 जणांवर उपचार सुरु

Follow Us
Close
Follow Us:

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवनाकवाडी येथे ग्रामदैवत श्री कल्याणताई मातेच्या यात्रेत महाप्रसाद किंवा स्टॉलवरील अन्नातून सुमारे 800 जणांना विषबाधा झाली आहे. उलटी, मळमळ सुरू झाल्याने 187 रुग्णांना तत्काळ इचलकरंजी येथील आयजी रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगणात आले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

संपूर्ण गावावरच प्रसंग ओढवल्याने रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे श्री कल्याणताई माता देवीची यात्रा भरते. मंगळवारी देवीचा महाप्रसाद होता. यावेळी गावातील प्रत्येक घरातील नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. संध्याकाळपर्यंत कोणलाच त्रास झाला नाही मात्र रात्रीनंतर अनेकांना उलटी, हगवण सुरू झाली. गावातील प्रत्येक घरात दोन-तीन जणांना मध्यरात्रीपासून रुग्णालयात हलविण्याचे काम सुरू झाले.

मध्यरात्री वाढला त्रास

सुरुवाताच्या काही तासात इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात लहान मुलांसह महिला, पुरुष व वृद्ध अशा सुमारे 100 जणांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला. मध्यरात्रीनंतर हा आकडा वाढत गेला. बुधवार सायंकाळपर्यंत सुमारे जिल्ह्यातील विविध शासकीय तसेच खासगी रुग्णालयात सुमारे ८०० जणांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. बीपी शुगर व इतर व्याधी असणाऱ्या काही जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे समजते.

लहान मुलांची प्रकृती स्थिर

काही लहान मुलांची प्रकृती सुरुवातीला गंभीर झाली होती. मात्र, त्यांच्यावरील धोका टळल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अद्याप या प्रकरणी चौकशी सुरू असून कोणावरही कारवाई करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, जिल्हा प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे. माजी राज्यमंत्री-आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषदेचे भाजपाचे पक्षप्रमुख विजय भोजे आणि पृथ्वीराज जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णांची माहिती घेतली.

Web Title: Around 800 peoples were poisoned by mahaprasad incident in kolhapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 07:57 AM

Topics:  

  • food poisoning news
  • kolhapur news

संबंधित बातम्या

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?
1

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी; अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी
2

कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी; अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
3

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
4

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.