Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलाकारांना मिळणार आपली कला सादर करण्यासाठी अनोखा मंच, पिडिलाइट फेविक्रिलचा इव्हेंट सुरु

पिडिलाइटचा फेविक्रिल ब्रँड "आर्टिस्ट इन मी (AIM)" कार्यक्रमा सुरु झाला आहे. भारतीय कलाकारांना कलाकार पी.एस. राठौर आणि शुचिता संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःची कला सादर करायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 20, 2025 | 05:44 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आर्ट अँड क्राफ्ट विभागातील ब्रँड फेविक्रिलने “आर्टिस्ट इन मी (AIM)” या अद्वितीय आणि परिवर्तनशील कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील १०० हून अधिक कलाकारांना तीन दिवसांच्या इमर्सिव अनुभवासाठी मुंबई येथे एकत्र आणण्यात आले. हे १००+ कलाकार ब्रँडच्या प्रमुख ‘फेविक्रिल सर्टिफाइड प्रोफेशनल्स’ कार्यक्रमाशी संलग्न असलेल्या हजारो कलाकारांमधून निवडले गेले आहेत.

पिडिलाइट इंडस्ट्रीजचे कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे सीनियर वाइस प्रेसिडेंट कश्यप गाला यांनी सांगितले, “आर्टिस्ट इन मी केवळ एक वर्कशॉप नाही, तर हा असा एक चळवळीचा भाग आहे, ज्याद्वारे भारतीय कलाकारांना बदलत्या आणि विकसित होणाऱ्या सर्जनशील जगाच्या मध्यभागी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही त्यांना जे उपकरणे, अनुभव आणि मेंटरशिप देत आहोत त्यातून केवळ भारताची कलात्मक विविधता साजरी होत नाही, तर हे कलाकार त्यांच्या समाजात शिक्षक, उद्योजक आणि सांस्कृतिक दूत बनण्याच्या मार्गावर देखील जात आहेत.”

‘एक राधा एक मीरा’नंतर मृण्मयी देशपांडेचा नवीन सिनेमा, ‘मनातली’टीमसोबत करणार कल्ला

यावर्षीच्या या रेसिडेंसी प्रोग्राममध्ये भारतीय कला आणि डिझाईन क्षेत्रातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वांनी भाग घेतला. ज्यामध्ये धाडसी आणि संस्कृती प्रेरित समकालीन कला यासाठी ओळखले जाणारे पी.एस. राठौर आणि टेक्स्टाईल डिझाईन वेंचर ‘व्होम’ च्या संस्थापक शुचिता संचेतीयांचे देखील समावेश आहे.

या दोघांनी “भारताचे कला प्रकार” या थीमखाली पारंपरिक पद्धती आणि ट्रेंड्स कला, डिझाईन, इंटिरिअर्स आणि फॅशन क्षेत्रातील यांवर सखोल चर्चा केली. त्यांच्या सत्रांमध्ये वॉल आर्ट, शाश्वतता, विषमता आणि सीमलेस सुर्रियलिझम यांसारख्या विषयांचा समावेश होता, ज्यामुळे कलाकारांना आधुनिक सौंदर्यशास्त्राच्या बदलत्या जगाची अधिक चांगली समज मिळाली.

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आराध्या पटेल गाजवणार छोटा पडदा, मालिकेचा प्रोमो रिलीज

या कार्यक्रमाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सर्व सहभागी कलाकारांनी मिळून तयार केलेले एक भव्य, शाश्वत भित्तीचित्र (म्युरल) इन्स्टॉलेशन. ही कलाकृती या कार्यशाळेच्या दीर्घकालीन ठसा म्हणून स्थापन करण्यात आली.

मुंबईत झालेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमात प्रात्यक्षिक सत्रे, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वर्कशॉप्स आणि इंटरअ‍ॅक्टिव्ह चर्चा यांचा समावेश होता, ज्यामुळे खुले संवाद आणि सहकार्याला प्रोत्साहन मिळाले. केवळ कलात्मक प्रशिक्षणच नव्हे, तर या वर्कशॉप्सद्वारे सहभागी कलाकारांना सोशल मीडिया व्यवस्थापन, डिजिटल प्रमोशन आणि व्यवसायिक संधी यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्यांचे शिक्षणही देण्यात आले, ज्यामुळे ते आजच्या डिजिटल आणि व्यावसायिक जगात यशस्वी होऊ शकतील.

Web Title: Artists will get a unique platform to showcase their art pidilite fevicryl event begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 05:44 PM

Topics:  

  • Art Exhibition
  • art festival
  • entertainment

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
4

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.