(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
स्टार प्लस आपल्या प्रेक्षकांसाठी ‘तू धडकन मैं दिल’ ही एक नवीन भावनिक कथा घेऊन येत आहे. ही मालिका एका लहान मुलीच्या जीवनावर आधारित आहे जिचे नाव दिल असते. जी लहान वयातच धैर्य आणि निरागसतेचे उदाहरण बनते. ही भूमिका बाल अभिनेत्री आराध्या पटेल साकारत आहे, जी तिच्या गोंडस अभिनयाने आणि भावनेने मन जिंकत आहे. आराध्या दूरचित्रवाणी मालिकेत नव्याने प्रवेश करत असली तरी आराध्या ही मनोरंजन उद्योगातील एक परिचित चेहरा आहे. प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड जाहिरातींमधील एका जाहिरातीत बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती झळकल्याने तिला नवी ओळख मिळाली, आणि तिने देशभरातील रसिक-प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली.
आणि आता आराध्या स्टार प्लस वाहिनीवरील बहुप्रतिक्षित ‘तू धडकन मैं दिल’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकण्याकरता सज्ज झाली आहे. या मालिकेच्या अलीकडेच दाखल झालेल्या प्रोमोला इंटरनेटवर मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि ‘दिल’च्या व्यक्तिरेखेची चर्चा सर्वत्र चांगलीच रंगली आहे.
अनुष्का नाही, ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होती विराट कोहलीचं पहिलं क्रश; स्वतः केला होता खुलासा!
‘तू धडकन मैं दिल’ या मालिकेत, आराध्या, मोठ्या धैर्याची मुलगी आहे, जी अतिशय निरागसतेने जीवनातील अनेक चढ-उतारांना तोंड देते. या मालिकेत प्रेम, कौटुंबिक बंधन आणि अतूट नातेसंबंध या सर्व गोष्टींचा वेध घेतला जात असून या सर्व गोष्टी लहान मुलीच्या दृष्टिकोनातून टिपल्या आहेत. आराध्याने ‘दिल’ ची साकारलेली व्यक्तिरेखा प्रामाणिक आणि मोहक आहे, यामुळे ही व्यक्तिरेखा सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना भावते आणि सर्वांकरता ही कथा प्रेरणादायी बनते.
‘एक राधा एक मीरा’नंतर मृण्मयी देशपांडेचा नवीन सिनेमा, ‘मनातली’टीमसोबत करणार कल्ला
मालिकेतील हृदयस्पर्शी कथाकथन आणि आराध्या पटेलचा आकर्षक अभिनय यामुळे, ‘तू धडकन मैं दिल’ अल्पावधीतच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होईल. याचे कारण हा कार्यक्रम जीवनातील आव्हाने आणि आनंद याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन प्रदान करतो. प्रेक्षकांना प्रेम आणि चिकाटी यांमध्ये जी ताकद असते, त्याची आठवण करून देतो. २३ जूनपासून स्टार प्लस वाहिनीवर भावना, प्रेम आणि आशा यांनी ओतप्रोत भरलेली ही कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.