Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जातो माघारी पंढरीनाथा’ म्हणत वारकऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू; आषाढीनंतर पंढरीतून भक्तांची एक्झिट; रेल्वे, बसस्थानकावर गर्दी

आषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर पंढरपूरातील लाखो वारकरी आता आपल्या गावाकडे परतू लागले आहेत. विठ्ठल दर्शनाचे समाधान आणि पंढरीचा विरह अशा भावनिक वातावरणात रेल्वे व बसस्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली.

  • By विवेक
Updated On: Jul 26, 2026 | 09:32 PM
‘जातो माघारी पंढरीनाथा’ म्हणत वारकऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू

‘जातो माघारी पंढरीनाथा’ म्हणत वारकऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू

Follow Us
Follow Us:

पंढरपूर, (वा.) महिनाभर पायी वारी करीत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांनी आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिभावात पार पाडल्यानंतर रविवारी द्वादशीला परतीचा प्रवास सुरू केला. ‘मनी विठ्ठल आणि मुखी जपनाम’ करीत पंढरपूरचा निरोप घेताना अनेक वारकऱ्यांचा कंठ दाटून आला होता. ‘पंढरीहूनि गावा जातां । खंती वाटे पंढरीनाथा ॥ आता बोळवीत यावे । आमुच्या गावा आम्हांसवें ॥१॥ सदगदित कंठ । फुटो पाहे हृदय ॥ निळा म्हणे पंढरीनाथा । चला गावा आमुच्या आतां ॥२॥’ ’ म्हणत भाविकांनी विठुरायाला निरोप दिला.

आषाढी यात्रेसाठी नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशी असे चार दिवस पंढरपुरात मुक्काम केलेल्या वारकऱ्यांनी चंद्रभागेत पवित्र स्नान, विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, मंदिर कळस दर्शन आणि नगर प्रदक्षिणा पूर्ण करून आता घराकडे परतीची वाट धरली आहे. यंदाच्या आषाढी यात्रेसाठी शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल झाले होते. यंदा पंढरपुरात ३५ लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती होती.

मिळेल त्या जागेत वारकऱ्यांचा मुक्काम

पंढरपूरमधील ६५ एकर येथील भक्तिसागर, रेल्वे मैदान तसेच उपनगरीय भागातील मोकळ्या जागांमध्ये वारकऱ्यांनी तंबू व राहुट्या उभारून मुक्काम केला होता. वाढलेल्या भाविकांच्या संख्येमुळे शहरात वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली होती. आषाढी सोहळ्यानंतर आता हळूहळू वारकऱ्यांची गर्दी कमी होत असून, शहरातील रस्त्यांवरून दिंड्या, टाळ-मृदंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर करीत वारकरी आपल्या गावाकडे रवाना होत आहेत.

कोकणवासियांवर बाप्पा पावला! रेल्वे प्रशासन अतिरिक्त गाडया सोडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

रेल्वे, बसस्थानकावर भाविकांची गर्दी

एकादशीच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील अनेक भाविकांनी पंढरपूरचा निरोप घेतला होता, तर राज्याच्या विविध भागांतून आलेले वारकरी द्वादशीला परतीच्या प्रवासाला लागले. त्यामुळे पंढरपूर रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर रविवारी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

विठ्ठल दर्शनाने समाधान, डोळ्यांत आनंदाश्रू

महिनाभराचा पायी प्रवास, उन्हा-पावसाची तमा न बाळगता केलेली वारी आणि विठुरायाचे मिळालेले दर्शन यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. पंढरी सोडताना मात्र विठ्ठलाच्या आठवणींनी अनेक वारकऱ्यांचे डोळे पाणावले.

Raigad News: पेणच्या बळीराजाला दिलासा; महापुरानंतर पावसाची साथ, भातशेतीत पुन्हा आशेचा अंकुर

Web Title: Ashadhi wari warakari return journey pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • pandharpur
  • Solapur

संबंधित बातम्या

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
1

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.