Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आषाढीसाठी पंढरपूरची तयारी; पंढरपूरमधील पश्चिमद्वार ते चौफाळा एकेरी मार्ग रहदारीस खुला ठेवण्याचे आदेश जारी

विठ्ठल रूक्मिणी मंदिराकडे येणारा व जाणारा मार्ग एकच असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. यामुळे आषाढी वारीच्या काळात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 21, 2025 | 02:47 PM
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गळती; छतावरून येतंय पाणी

पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गळती; छतावरून येतंय पाणी

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आषाढी यात्रा सोहळा कालावधी दि. २६ जून  ते १० जुलै २०२५ असा असणार आहे. या सोहळ्यासाठी सुमारे 14 ते 15 लाख भाविक पंढरपूर शहरात येतात. विठ्ठल रूक्मिणी मंदिराकडे येणारा व जाणारा मार्ग एकच असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. अशावेळी चेंगराचेंगरी होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता असते. यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे.

आषाढी वारीमुळे मोठ्या संख्येने भाविक व वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. यामुळे येत्या ०५ जुलै रोजी सकाळी ०६.०० ते दि.०६ जुलै २०२५ रोजीचे सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी, भाविक यांच्याकरीता बाहेर पडण्यासाठी एकेरी रहदारीस खुला ठेवणेबाबत आदेश  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत.

आषाढी यात्रा सोहळयाकरीता लाखो भाविक पंढरपूर शहर व परिसरात येतात व एकादशी सोहळयादिवशी चंद्रभागा स्नान करून भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. तेव्हा महाद्वार घाट व आजूबाजूच्या रस्त्यामध्ये लाखो भाविकांची गर्दी असते. सदरची गर्दी नियंत्रणात आणणेसाठी पोलीस प्रशासनाला मानवी साखळीचा व रस्सीचा वापर करावा लागतो.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असून भाविकांना पुरविण्यात येणा-या सोईसुविधा कमी पडू नये यासाठी प्रशासन कार्यरत आहे. तथापि पंढरपूर शहरातील भाविकांची संख्या व सुरक्षितता लक्षात घेता यात्रा सोहळयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. पश्चिमद्वार ते चौफाळा हा एकेरी मार्ग झाल्यास स्टेशन रोडकडून येणारे वारकरी, भाविक हे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक भादुले चौक ते नाथ चौक तांबडा मारूती चौक- महाद्वार चौकमार्गे नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जावू शकतात. तसेच प्रदक्षिणामार्गे येणारे भाविक हे उत्पात गल्ली येथील रस्त्याने नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जाऊ शकतात.

प्रशासनाकडून दर्शनरांग व्यवस्थापन करून गर्दी आटोक्यात आणण्याची कार्यवाही केली जाते. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराकडे जाणारे रस्ते अरूंद असून त्याठिकाणी येणारे व जाणारा मार्ग एकच असलेने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी चेंगराचेंगरी होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.  पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी, भाविकांना बाहेर पडण्याचा एकेरी रहदारी मार्ग केल्यास गर्दीवर नियंत्रण करणे सुरक्षित होईल. त्यामुळे पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी भाविकांसाठी बाहेर पडण्याचा एकेरी रहदारीसाठी होणे सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाचे आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी  आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ (क) अन्वये, सदर आदेश पारीत केला आहे.या आदेशाचे उल्लंघन झाल्यास उल्लंघन करणाऱ्या विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नुसार कारवाईस पात्र राहील. असे आवाहनही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

Web Title: Ashadi ekadashi 2025 pandharpur vitthal rukmini news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Pandharpur News
  • Vitthal Rukmini Mandir

संबंधित बातम्या

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद
1

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

पंढरपूरमध्ये रेशनचा काळाबाजार, पुरवठा विभागाकडून कारवाईसाठी टाळाटाळ; शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप
2

पंढरपूरमध्ये रेशनचा काळाबाजार, पुरवठा विभागाकडून कारवाईसाठी टाळाटाळ; शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप

कासेगाव परिसरात पुन्हा मुसळधार पावसाचे थैमान; शेतकऱ्यांवर आस्मानी संकट, शेताला तळ्याचे स्वरुप
3

कासेगाव परिसरात पुन्हा मुसळधार पावसाचे थैमान; शेतकऱ्यांवर आस्मानी संकट, शेताला तळ्याचे स्वरुप

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात
4

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.