Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra IAS Transfers: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ८ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; काय आहे अशोक खरात कनेक्शन?

या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे राज्य सरकारने पहिल्यांदाच एका उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांची तडकाफडकी बदली केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 28, 2026 | 11:07 AM
Maharashtra IAS Transfers: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ८ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; काय आहे अशोक खरात कनेक्शन?
Follow Us
Follow Us:

Maharashtra IAS Transfers:  नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणत उच्चभ्रू वर्गांतील महिलांसह काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही लागेबांधे असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय वर्तुळात मोठे फेरबदल केले आहेत. राज्य सरकारने शुक्रवारी ८ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या अटकेपूर्वी शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन आयएएस अधिकाऱ्यांशी खराने गुप्त बैठक घेतली होती. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे राज्य सरकारने पहिल्यांदाच एका उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांची तडकाफडकी बदली केली आहे. याशिवाय अशोक खरातच्या बेनामी मालमत्ता आणि गुंतवणीमध्ये काही महसूल अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा संशय आहे. त्यामुळे या बदल्यांकडे ‘प्रशासकीय शुद्धीकरण’ म्हणून पाहिले जात असल्याची चर्चा आहे.

Sangali IAS transfer: सांगलीला नवे जिल्हाधिकारी! डॉ. मैनक घोष यांची नियुक्ती; अशोक काकडे यांची मुंबईत बदली

1. श्रीमती रुबल अग्रवाल,”व्यवस्थापकीय संचालक, महामुंबई मेट्रो”,”विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई”
2. श्रीमती नयना गुंडे,”आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे”,”विभागीय आयुक्त, अमरावती विभाग”
3. श्रीमती श्वेता सिंघल,”विभागीय आयुक्त, अमरावती”,”व्यवस्थापकीय संचालक, महामुंबई मेट्रो, मुंबई”
4. अशोक काकडे,”जिल्हाधिकारी, सांगली”,”व्यवस्थापकीय संचालक, MAIDC, मुंबई”
5. राहुल रेखवार,-,”सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ”
6. एम. देवेंद्र सिंग,-,”सहआयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)”
7. मैनक घोष,”मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, धाराशिव”,”जिल्हाधिकारी, सांगली”
8 प्रियंवदा म्हाड्डळकर,-,”मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, धाराशिव”

महत्त्वाचे बदल:
मेट्रो आणि कोकण विभाग: रुबल अग्रवाल आणि श्वेता सिंघल यांच्यात पदांची अदलाबदल झाली असून, अग्रवाल आता कोकणच्या विभागीय आयुक्त असतील.

जिल्हाधिकारी सांगली: सांगलीच्या जिल्हाधिकारी पदी आता तरुण आयएएस अधिकारी डॉ. मैनक घोष यांची नियुक्ती झाली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ: राहुल रेखवार यांच्याकडे राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Recipe : लहान मुलं सारखी पिझ्झाचा हट्ट करतायेत? मग विकतचा नको, घरीच बनवा हेल्दी ‘रव्याचा पिझ्झा’

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात कोणत्याही अधिकाऱ्याचा हस्तक्षेप किंवा आर्थिक सहभाग खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच विधानसभेत दिला होता. एका बाजूला एसआयटी खरातच्या ४० कोटींच्या मालमत्तेचा शोध घेत असतानाच, या बदल्यांच्या माध्यमातून सरकारने प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात या चौकशीत आणखी काही नावे समोर आल्यास अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title: Ashok kharat scandal impact cm devendra fadnavis shuffles 8 senior ias officers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • Maharashtra Politics
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

अशोक खरातवरील सिनेमावरून रुपाली चाकणकर भडकल्या, चित्रपटाविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा
3

अशोक खरातवरील सिनेमावरून रुपाली चाकणकर भडकल्या, चित्रपटाविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार; एक-दोन नाहीतर तब्बल 105 साक्षीदार तयार
4

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार; एक-दोन नाहीतर तब्बल 105 साक्षीदार तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.