
attach another small machine with EVM machines 2026 municipal elections decision by Election Commission
ईव्हीएम मशीनवरुन यापूर्वी मोठा गदारोळ झाला आहे. ईव्हीएम मशीनवर निवडणूक घेण्यास विरोधकांचा विरोध आला. या वादामध्ये आणखी एक ठिणगी पडली. आता पालिका निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनसोबत आणखी मशीन लावण्यात येणार आहे. मतमोजणीवेळी कंट्रोल युनिट (Control Unit) आणि बॅलेट युनिट (Ballot Unit) यांना एकत्र जोडण्याचे आदेश आहेत. या प्रक्रियेत, जर कंट्रोल युनिटचा डिस्प्ले काही कारणास्तव काम करू शकला नाही, तर पाडू (PADU) नावाचे एक पर्यायी उपकरण वापरले जाईल.
हे देखील वाचा : दुबार मतदार सापडला तर त्याला तिथेच ठोका…! ठाकरे बंधूंनी आदेश दिल्याचे संजय राऊतांची कबुली
पाडू म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (Printing Auxiliary Display Unit) होय. हे उपकरण कंट्रोल युनिटची हुबेहूब प्रतिकृती असून, ते बॅकअप यंत्रणा म्हणून कार्यरत राहील. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या उत्पादक कंपनीने याची निर्मिती केली आहे. कंपनीने १४० पाडू युनिट्स पाठवले असून, त्यांची गरज क्वचितच पडेल असे म्हटले आहे. ही युनिट्स रिटर्निंग ऑफिसर (RO) यांच्याकडे उपलब्ध असतील. मात्र या नवीन मशीनवर विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. अचानक हे नवीन यंत्र का बसवण्यात येत आहे असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले आहेत.
हे देखील वाचा : महापालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या; पण तरीही उमेदवारांना ‘असा’ करता येणार प्रचार
आमदार रोहित पवार यांनी ईव्हीएम मशीनच्या या नव्या यंत्रावरुन टीका केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “कुणालाही काडीचीही कल्पना न देता निवडणूक आयोगाने एक नवीन मशीन आणलं असून ते EVM ला जोडण्यात येणार असल्याचं समजतंय. हे मशीन काय आहे, कशाचं आहे आणि कशासाठी लावलं जातंय याची कुणालाही कोणतीही कल्पना नाही, याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी काढलेला मुद्दा तर खूप धक्कादायक आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे. असं असेल तर निवडणुका घेण्याचा हा केवळ फार्स तर नाही ना? असंच करायचं असेल तर भाजपाने लोकशाहीच्या फोटोला हार घालून या निवडणुकीत त्यांचे सगळेच उमेदवार निवडून आले, असं तरी जाहीर करावं, अशी आक्रमक भूमिका रोहित पवारांनी घेतली आहे.