Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: लक्ष्मीपूजनानिमित्त सजले ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी’ मंदिर; परिसरात भव्य फुलांची सजावट

मंदिरातील श्री विठ्ठल चौखांबी, सोळ खांबी परिसर, रुक्मिणी मातेचे मंदिर, तसेच प्रवेशद्वार,  या सर्व भागात कलात्मक डेकोरेशन करण्यात आले आहे. पारंपारिक आणि आधुनिक फुलांच्या रचना यांचा सुंदर संगम भाविकांना एक अद्भुत दृश्यानुभ

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 21, 2025 | 09:38 PM
Diwali 2025: लक्ष्मीपूजनानिमित्त सजले ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी’ मंदिर; परिसरात भव्य फुलांची सजावट
Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर: दीपावलीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या वतीने मंदिर परिसरात लक्ष्मीपूजनानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीत वैभव, भक्ती आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम साधण्यात आला आहे. सदर सजावट श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त अर्जुन हनुमान पिंगळे (रा. बीड) यांच्या मार्फत करण्यात आली आहे. सजावटीसाठी सुमारे १५०० ते २००० किलो इतक्या प्रमाणात विविध प्रकारची ताजी फुले वापरण्यात आली आहेत.

या फुलांमध्ये, कोंडा, शेवंती, अष्टर, गुलाब, ऑर्किड, अँथोनीयम, जिप्स, सायकस, गुलछडी, इत्यादी फुलांचा समावेश असून या सर्व फुलांद्वारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग, सुगंध आणि भक्तीभावाने उजळून निघाला आहे. मंदिरातील श्री विठ्ठल चौखांबी, सोळ खांबी परिसर, रुक्मिणी मातेचे मंदिर, तसेच प्रवेशद्वार,या सर्व भागात कलात्मक डेकोरेशन करण्यात आले आहे. पारंपारिक आणि आधुनिक फुलांच्या रचना यांचा सुंदर संगम भाविकांना एक अद्भुत दृश्यानुभूती देत आहे.

या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक फुलांचा अत्यंत कुशलतेने केलेला वापर, रंगसंगतीतील समतोल, तसेच विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराच्या आध्यात्मिकतेला साजेसा सुगंधित वातावरणनिर्मिती झाली आहे.अशी माहिती प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने भाविकांसाठी दीपावलीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून, भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

‘स्वदेशी’ची लाट! दिवाळीत ६.०५ लाख कोटींचा बंपर व्यवसाय

दिवाळीच्या मुहूर्तावर भारतामध्ये विक्रमी ६.०५ लाख कोटींची (6.05 Lakh Crore) विक्रमी विक्री झाली आहे. यामध्ये ५.४० लाख कोटी रुपयांची उत्पादने आणि ६५,००० कोटी रुपयांच्या सेवांचा समावेश आहे. व्यापारी संघटना ‘कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (CAIT) ने मंगळवारी ही माहिती दिली.

दिवाळीत विक्रमी विक्री नोंदवली

कैटने एका निवेदनात सांगितले की, नुकत्याच जीएसटी दरांमध्ये केलेल्या कपातीमुळे आणि ग्राहकांच्या मजबूत विश्वासामुळे यावर्षी दिवाळीत विक्रमी विक्री नोंदवली गेली. देशभरातील ६० प्रमुख वितरण केंद्रांमध्ये (राजधानी आणि टियर-२/टियर-३ शहरे) केलेल्या सर्वेक्षणातून कैटने हे आकडे जाहीर केले.

Diwali Business News: ‘स्वदेशी’ची लाट! दिवाळीत ६.०५ लाख कोटींचा बंपर व्यवसाय, चीनच्या उत्पादनांना मोठा फटका

विक्रीत १.८० लाख कोटींची वाढ

  • यावर्षीची विक्री: ६.०५ लाख कोटी.
  • मागील वर्षीची विक्री: व्यापारी संघटनेनुसार, गेल्या वर्षी दिवाळीत ४.२५ लाख कोटींची विक्री झाली होती.
  • ट्रेडिंगचे योगदान: एकूण व्यापारात, गैर-कॉर्पोरेट (Non-Corporate) आणि पारंपारिक बाजारपेठांचे योगदान ८५ टक्के राहिले, जे ऑनलाइन शॉपिंगच्या युगात लहान व्यापारी आणि भौतिक बाजारपेठांचे पुनरागमन दर्शवते.

Web Title: Attractive flower decoration in shri vitthal rukmini temple pandharpur diwali 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 09:21 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • pandharpur
  • Shri Vitthal Rukmini Temple

संबंधित बातम्या

Diwali 2025: पर्यावरणस्नेही फटाकेही ठरले ध्वनिप्रदूषणाचे कारण; MPCB च्या चाचणीत एकही…
1

Diwali 2025: पर्यावरणस्नेही फटाकेही ठरले ध्वनिप्रदूषणाचे कारण; MPCB च्या चाचणीत एकही…

Diwali 2025: ‘सुगंधात न्हालेली दिवाळी’; सेंटेड मेणबत्यांना बाजारात वाढली मागणी
2

Diwali 2025: ‘सुगंधात न्हालेली दिवाळी’; सेंटेड मेणबत्यांना बाजारात वाढली मागणी

Diwali 2025 Sales: या दिवाळीत विक्रीचा नवा विक्रम, 6.05 लाख कोटींचा व्यवसाय, बाजारात “व्होकल फॉर लोकल” चा आवाज
3

Diwali 2025 Sales: या दिवाळीत विक्रीचा नवा विक्रम, 6.05 लाख कोटींचा व्यवसाय, बाजारात “व्होकल फॉर लोकल” चा आवाज

Kalyan : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचा KDMC मुख्यालयासमोर बोनससाठी आंदोलन
4

Kalyan : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचा KDMC मुख्यालयासमोर बोनससाठी आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.