'स्वदेशी'ची लाट! दिवाळीत ६.०५ लाख कोटींचा बंपर व्यवसाय (Photo Credit- X)
Diwali Business News: यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर भारतामध्ये विक्रमी ६.०५ लाख कोटींची (6.05 Lakh Crore) विक्रमी विक्री झाली आहे. यामध्ये ५.४० लाख कोटी रुपयांची उत्पादने आणि ६५,००० कोटी रुपयांच्या सेवांचा समावेश आहे. व्यापारी संघटना ‘कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (CAIT) ने मंगळवारी ही माहिती दिली.
कैटने एका निवेदनात सांगितले की, नुकत्याच जीएसटी दरांमध्ये केलेल्या कपातीमुळे आणि ग्राहकांच्या मजबूत विश्वासामुळे यावर्षी दिवाळीत विक्रमी विक्री नोंदवली गेली. देशभरातील ६० प्रमुख वितरण केंद्रांमध्ये (राजधानी आणि टियर-२/टियर-३ शहरे) केलेल्या सर्वेक्षणातून कैटने हे आकडे जाहीर केले.
‘या’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी ‘लक्झरी’ झाली! चक्क Diwali Bonus म्हणून मिळाली आलिशान कार
विक्रीमध्ये खालील क्षेत्रांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले:
क्षेत्र (Sector) | विक्रीतील टक्केवारी | अंदाजित रक्कम |
राशन सामग्री व रोजचे सामान | १२% | ₹७२,६०० कोटी |
सोने आणि दागिने | १०% | ₹६०,५०० कोटी |
इलेक्ट्रॉनिक्स आणि वीज उपकरणे | ८% | ₹४८,४०० कोटी |
टिकाऊ ग्राहक उत्पादने | ७% | ₹४२,३५० कोटी |
रेडिमेड कपडे व भेटवस्तू | १४% (प्रत्येकी ७%) | ₹८४,७०० कोटी |
गृहसजावट, फर्निचर | १०% (प्रत्येकी ५%) | ₹६०,५०० कोटी |
मिठाई, नमकीन, वस्त्र, पूजा साहित्य, फळे | उर्वरित | – |
या विक्रमी विक्रीमुळे भारतीय ग्राहकांचा ‘स्वदेशी’ वस्तूंवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट होते, ज्यामुळे चीनमधून आयात केलेल्या उत्पादनांना मोठा झटका बसला आहे.