Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याची मान उंचावली,भारताच्या राष्ट्रपतींच्या समोर दसपटीच्या सुपुत्राने दिला कोकणाचा परिचय

चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील कळकवणे गावचे सुपुत्र भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा ही भारतीय संघाची एक औपचारिक नागरी सेवा आहे. ही सेवा संघाच्या मध्यम आणि उच्चस्तरीय व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 26, 2025 | 06:37 PM
कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याची मान उंचावली

कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याची मान उंचावली

Follow Us
Close
Follow Us:

चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील कळकवणे गावचे सुपुत्र भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा (IA&AS) ही भारतीय संघाची एक औपचारिक नागरी सेवा आहे. ही सेवा संघाच्या मध्यम आणि उच्चस्तरीय व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावते. या सेवेचे समर्थ अविनाशराव शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर राष्ट्रपती भवनमध्ये कोकणाचा परिचय करून देताना उत्तम सादरीकरणाने कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याची मान उंचावली आहे.

भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यशस्वी होत शिमला येथे प्रशिक्षण घेत असलेल्या भावी सनदी अधिकाऱ्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विशेष निमंत्रणास अनुसरुन राष्ट्रपती भवनास भेट देऊन प्रशिक्षणाबाबत सादरीकरण करण्याची नुकतीच संधी समर्थ शिंदे यांना प्राप्त झाली.

“मराठी भाषेचे जतन करण्यासाठी कटिबद्ध..”, चिपळुणमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा

कोकणातील दसपटी,चिपळूण येथील २०२४ च्या बॅचमधून भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा (IA&AS) कॅडर असलेल्या समर्थ अविनाशराव शिंदे यांना कोकण विभागाच्या परिचय सादरीकरण करण्याची संधी मिळाली. आपल्या प्रशिक्षणाबाबत प्रभावीपणे आणि आत्मविश्वासाने माहिती देत समर्थने राष्ट्रपती भवनात कोकणचा, दसपटीचा आवाज पोचवला. चाणक्य मंडळच्या मुशीत घडलेल्या समर्थ शिंदे यांच्यावर अविनाश धर्माधिकारी यांचे संस्कार असून संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास ही कौशल्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच आत्मसात केली आहेत.

समर्थच्या या कामगिरीने देशातील अव्वल कॅडरमध्ये कोकणातील कर्तृत्वाचा ठसा उमटत असून भविष्यात येथील विद्यार्थ्यांसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरेल. याबद्दल समर्थ शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा (IA&AS) ही भारतातील सर्वोच्च लेखापरीक्षा संस्था आहे. ही एक गट ‘अ’ केंद्रीय नागरी सेवा आहे. या संस्थेचे अधिकारी केंद्र आणि राज्य सरकारच्या खात्यांचे ऑडिट करतात.

IA&AS च्या कामाची वैशिष्ट्ये:

केंद्र आणि राज्य सरकारच्या खात्यांचे ऑडिट करणे
सार्वजनिक व्यावसायिक उपक्रम आणि गैर-व्यावसायिक स्वायत्त संस्थांच्या खात्यांचे ऑडिट करणे
सरकारी वित्तपुरवठ्यात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे
सुशासनाच्या यंत्रणेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे

IA&AS अधिकाऱ्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या:

संस्थेचे मध्यम आणि उच्चस्तरीय व्यवस्थापन तयार करणे
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) यांच्या आदेशांचा वापर करणे
IA&AS मध्ये सामील होण्यासाठी:
UPSC नागरी सेवा परीक्षा (UPSC CSE) द्यावी लागते
लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA), मसुरी येथे अभ्यासक्रम करावा लागतो

Rupali Chakankar : तरुण मुलींनी अनोळखी व्यक्तींवर….; स्वारगेट बसस्थानकातील बलात्काराच्या घटनेवर रुपाली चाकरणकरांची प्रतिक्रिया

Web Title: Avinashrao shinde introduced konkan in front of president draupadi murmu at rashtrapati bhavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 06:37 PM

Topics:  

  • Draupadi Murmu
  • Konkan

संबंधित बातम्या

Maharashtra Rain: सावधान! समुद्र खवळला; काही तासांत अतिवृष्टी होणार; खडकवासल्यातून 35 हजार क्युसेकने विसर्ग
1

Maharashtra Rain: सावधान! समुद्र खवळला; काही तासांत अतिवृष्टी होणार; खडकवासल्यातून 35 हजार क्युसेकने विसर्ग

Breaking: गणपतीपुळेला जाताय? मग ‘ही’ बातमी वाचाच; मंदिर देवस्थानचे भाविकांसाठी महत्वाचा निर्णय
2

Breaking: गणपतीपुळेला जाताय? मग ‘ही’ बातमी वाचाच; मंदिर देवस्थानचे भाविकांसाठी महत्वाचा निर्णय

Konkan : कोकणातील प्रत्येक गावात असते देवाची वाट; नेमकं काय आहे याचं रहस्य ?
3

Konkan : कोकणातील प्रत्येक गावात असते देवाची वाट; नेमकं काय आहे याचं रहस्य ?

मस्ती बेतली असती जीवावर! शेकडो भुतांचा घोळका लागला मागे… आजही भरते त्यांची जत्रा “जो गेला, तो खपला”
4

मस्ती बेतली असती जीवावर! शेकडो भुतांचा घोळका लागला मागे… आजही भरते त्यांची जत्रा “जो गेला, तो खपला”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.