
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे दु:खद निधन
वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
गेले दहा दिवस त्यांच्यावर पुना हाॅस्पिटल सुरू होते उपचार
पुणे: कष्टकऱ्यांचे नेते डाॅ. बाबा आढाव यांचे अल्पशा आजारामुळे निधन झाले. हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांच्या न्यायासाठी लढणार्यांचे ‘आभाळ आज काेसळले. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे गेले दहा दिवस त्यांच्यावर पुना हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. उपचाराला प्रतिसाद न दिल्याने अखरे उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. बाबा आढाव रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या तब्यतीची विचारपूस केली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील रुग्णालयात जाऊन तब्यतीची विचारपूस केली होती. आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ मानले जात होते. ते केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नसून, सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकर्यांचे खर्या अर्थाने नेते म्हणून आयुष्यभर काम केले. त्यांनी आपले संपूर्ण जीवन असंघटित आणि वंचित कष्टकरी विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी काम केले. त्यांचे वडील पांडुरंग यांचा मसूर वितरणाचा व्यवसाय होता. 1930 च्या मोठ्या आर्थिक मंदीमध्ये त्यांच्या वडिलांचा व्यवसाय बंद पडला. त्यानंतर, बाबा 3 महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. बाबा आणि त्यांच्या 4 भावंडांचे पालनपोषण त्यांच्या आई बाबूताई पांडुरंग आढाव यांनी केले.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक; शरद पवारांकडून रुग्णालयात जाऊन विचारपूस
बाबांनी प्राथमिक शिक्षण पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक शाळेतून घेतले आणि उच्च शिक्षण पुण्यातील शिवाजी मराठा शाळेतून घेतले. 1952 मध्ये त्यांनी ताराचंद रामनाथ आयुर्वेद महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि पुण्यातील त्यांच्या नाना पेठेतील घरी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. लहानपणी बाबा भाऊसाहेब रानडे, एस.एम. जोशी, नारायण गणेश गोरे, एन.जी. गोरे आणि राममनोहर लोहिया यांच्या समाजवादी सिद्धांतांनी प्रेरित झाले. त्यांच्या सुरुवातीच्या काळात, त्यांनी राष्ट्र सेवा दलात भाई वैद्य, पन्नालाल सुराणा, बापू काळदाते यांच्यासह इतर समाजवादी नेत्यांसोबत काम केले जे त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांचे जवळचे मित्र आणि सहयोगी बनले.
बाबांनी 1966 मध्ये शीला गरुडशी लग्न केले. त्या परिचारिका म्हणून काम करत होत्या. 1952 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या दुष्काळादरम्यान, काही हमालांनी बाबांना त्यांच्या संघटनेचे नेतृत्व करण्यासाठी संपर्क साधला. महागाई आणि अन्नधान्याच्या रेशनिंगविरुद्ध सत्याग्रह केला. त्यांनी 3 आठवडे तुरुंगवास भोगला आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी आपले करिअर बदलण्याचा निर्णय घेतला. 1955 मध्ये, बाबांनी हमालांना संघटित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले, पहिली असंघटित कामगार संघटना हमाल पंचायतची 1963 मध्ये स्थापना केली. बाबा पुणे मतदारसंघातील भवानी पेठचे नगरपालिका नगरसेवक (नगरसेवक) म्हणून निवडून आले. नगरपालिका निवडणूक नागरिक संघटनेच्या अंतर्गत लढवण्यात आली. निवडून आलेले सदस्य म्हणून त्यांनी वंचितांसाठी काम केले आणि झोपडपट्टीवासीयांसाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक प्रश्न सोडवले.
*गंज पेठेतील महात्मा ज्याेतिबा फुले वाड्याच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी त्यांनी आंदोलने केली. तसेच महिलांची पहीली शाळा असलेल्या भिडे वाड्याच्या ठिकाणी स्मारक करण्यासाठी त्यांनी ठाम भुमिका मांडली हाेती.
* हमाल पंचायतीची स्थापना करून असंघटित कामगारांसाठी कायदे (जसे माथाडी कायदा) मिळवून दिले, जे महात्मा फुले यांच्या कार्याशी सुसंगत होते. माथाडी कायद्यातील दुरुस्तीच्या विराेधातही त्यांनी गेल्या काही वर्षांत अांदाेलन केले अाणि भुमिका मंाडली हाेती.
* कष्टाची भाकर म्हणजे कठोर परिश्रमाने कमावलेली भाकरी, जी खाल्ल्याने मिळणारे समाधान आणि पौष्टिकता अनमोल असते. डाॅ. अाढाव यांनी हमाल पंचायत या संघटनेच्या माध्यमातून कामगारांसाठी स्वस्त जेवणाचा उपक्रम राबवला.
* पुण्यात रिक्षा चालकांची संख्या माेठ्या प्रमाणावर अाहे. त्यांच्या हक्क अाणि मागण्यांसाठी रिक्षा पंचायत ही संघटना त्यांनी स्थापन केली. िरक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली.