सौजन्य - नवराष्ट्र टीम
डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हृदयाशी संबंधित त्रास वाढल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य आणि त्यांच्या टीमकडून उपचार सुरू असून, सध्या प्रकृती स्थिर असली तरी पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आढाव यांच्या कुटुंबीयांनी जनतेला कोणत्याही अफवा न पसरविण्याची विनंती केली आहे. अधिकृत किंवा कुटुंबीयांकडून मिळणाऱ्या माहितीलाच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.
कामगार, कष्टकरी आणि वंचित घटकांसाठी आयुष्यभर काम करणारे बाबा आढाव यांचे स्वास्थ्य लवकर सुधारावे, यासाठी राज्यभरातून प्रार्थना व्यक्त होत आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्ते, कामगार संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करून लवकर बरे होण्याची आशा व्यक्त केली आहे. कष्टकऱ्यांचे नेते म्हणून बाबा आढाव यांना ओळखलं जातं असून त्यांनी आपले संपूर्ण जीवन कामगार संघटना आणि वंचितांच्या हक्कांसाठी समर्पित केलं आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात अभ्यासिकांसाठी नियंत्रण नियमावली हाेणार; नेमकं काय करणार उपाययाेजना?






