Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉक्टर अन् हॉस्पिटल देवदूत नव्हे तर…? 18 वर्षांच्या तरुणाला गमवावा लागला जीव, गंभीर प्रकार काय?

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी तातडीने चौकशी समिती नेमली आहे. दोषी आढळणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 10, 2026 | 06:55 PM
'डॉक्टर अन् हॉस्पिटल देवदूत नव्हे तर...'; 18 वर्षांच्या तरुणाला गमवावा लागला जीव, गंभीर प्रकार काय?

'डॉक्टर अन् हॉस्पिटल देवदूत नव्हे तर...'; 18 वर्षांच्या तरुणाला गमवावा लागला जीव, गंभीर प्रकार काय?

Follow Us
Follow Us:

पिंपरीत डॉक्टर, हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू
नातेवाइकांचा हलगर्जीपणाचा आरोप
जिल्हा शल्यचिकित्सकांनी  नियुक्त केली चौकशी समिती

पिंपरी: खासगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च पेलवत नसल्याने सरकारी रुग्णालयाचा आधार घेणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणाला प्रशासकीय अनास्थेमुळे जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संकेत रणजित सूर्यवंशी (वय १८, रा. नवी सांगवी, मूळ रा. लातूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या आईने केला असून, याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संकेतला प्रकृती अस्वास्थ्यामुळे नवी सांगवी येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी तातडीने ‘आयसीयू’ बेडची गरज असल्याचे सांगितले. मात्र, खासगी रुग्णालयातील खर्च आवाक्याबाहेर असल्याने नातेवाइकांनी शुक्रवारी (दि. ६) रात्री साडेअकराच्या सुमारास त्याला औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला त्याला सर्वसाधारण वॉर्डात आणि त्यानंतर अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. मात्र, शनिवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Guhagar News: शासकीय डॉक्टरांकडून रुग्णसेवा वाऱ्यावर? ‘त्या’ अधिकाऱ्यावर तातडीच्या कारवाईची मागणी

कर्मचाऱ्यांकडून मदतीस नकार

रुग्णालयात दाखल करताना मदत करण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी उद्धट वर्तन केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. संकेतला स्ट्रेचरवरून नेण्यासाठी वॉर्डबॉयला विनंती केली असता, “हे आमचे काम नाही,” असे म्हणत त्याने मदत नाकारल्याचे संकेतच्या आई रागिणी सूर्यवंशी यांनी सांगितले. मुलाच्या निधनानंतर धक्का बसल्याने रागिणी यांचा रक्तदाब वाढला होता, मात्र त्यांनाही वेळेवर उपचार देण्याची तसदी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी घेतली नाही, असा संताप नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.

दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी तातडीने चौकशी समिती नेमली आहे. दोषी आढळणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीला येत्या दोन दिवसांत आपला अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
— डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक.

30 मिनिटे मृत्यूशी झुंज… थांबलेलं हृदय, बंद झालेले श्वास, डॉक्टरांनी अक्षरशः खेचून आणला जीव; Video Viral

कुटुंबावर कोसळला दुखाचा डोंगर

मृत संकेतची मोठी बहीण परिचारिकेचे (नर्सिंग) प्रशिक्षण घेत आहे, तर वडील चालक म्हणून काम करतात. लातूरहून पोटापाण्यासाठी पुण्यात आलेल्या या कुटुंबातील तरुण मुलाचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Relatives allege the youth died due to lack treatment doctors and aundh district hospital pimpri crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • crime news
  • Death
  • Doctor
  • Pimpri

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.