Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे-उद्धव ठाकरे यांनी दोन पावले माघार घ्यावी, दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास…; बच्चू कडू यांचं मोठं विधान

दोन गोष्टी एकनाथ शिंदे यांनी तर दोन गोष्टी उद्धव ठाकरे यांनी मागे घ्याव्यात. पुन्हा दोन्ही शिवसेनेने एकत्र येऊन कामाला लागावे. २०२९ हे शिवसेनेचे पर्व राहील, अशी अपेक्षा शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 21, 2026 | 10:39 AM
शिंदे-उद्धव ठाकरे यांनी दोन पावले माघार घ्यावी, दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास...; बच्चू कडू यांचं मोठं विधान

शिंदे-उद्धव ठाकरे यांनी दोन पावले माघार घ्यावी, दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास...; बच्चू कडू यांचं मोठं विधान

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. आमदार बच्चू कडू यांनी याबाबत एक मोठं विधान केलं आहे. एकच पक्ष वारंवार का फुटतो, याचे संशोधन होणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन शिवसेनेची ताकद कशी वाढेल, याचा विचार केला पाहिजे. दोन गोष्टी एकनाथ शिंदे यांनी तर दोन गोष्टी उद्धव ठाकरे यांनी मागे घ्याव्यात. पुन्हा दोन्ही शिवसेनेने एकत्र येऊन कामाला लागावे. २०२९ हे शिवसेनेचे पर्व राहील, अशी अपेक्षा शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. शनिवारी (दि. २०) एका कार्यक्रमासाठी ते शहरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

 

आमदार कडू पुढे म्हणाले, शिवसेना हे महाराष्ट्रातल्या मातीचे संघटन आहे. ते मजूबत राहणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न झाले पाहिजे. दोघे एकत्रित आले पाहिजे. दोघांत ताळमेळ झाला तर दोन्ही शिवसेनेची वज्रमूठ कशी तयार होईल हे पाहायला काय हरकत आहे. या माझ्या व्यक्तिगत भावना असल्याचे कडू म्हणाले.

दरम्यान, शिवसेना आता पूर्ण ताकदीने आणि मजबुतीने काम करेल. २०२९ हे शिवसेनेचे पर्व राहील. त्या दृष्टीने आम्ही सामोरे जाऊ. जीवाचे रान करू. २०२९ हे शिवसेनेला कलाटणी देणारा आणि संपूर्ण महाराष्ट्राला नवी दिशा देणारे वर्ष असेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. फुटाफुटीवर भाष्य करताना कडू म्हणाले, राजकारण हे बेरजेचे असते. ते कधीही वजाबाकीत जात नाही.

आपल्याच नेत्यावर आरोप लावणे चुकीचे

एखादा नेता फुटला म्हणजे तो पैसे घेऊनच फुटला असे म्हणणे योग्य होणार नाही. आपल्याच लोकांवर असा डाग लावणे बरोबर नाही. राज्यात विधान परिषदेच्या सहा ठिकाणी जागा बिनविरोध आल्या. राज्यात तीन- चार विरोधी पक्ष आहेत. असे असूनही त्यांनी सहा बिनविरोध जागा का होऊ दिल्या? तुम्हाला उभे करायला एक कार्यकर्ताही सापडला नाही? अशावेळी जे पळाले तर पैसे घेऊनच पळाले असा दोष देणे चुकीचे असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

हे सुद्धा वाचा : अपघाताचा बनाव करत 26 वर्षीय तरुणाची हत्या; तीन मित्रांनी दगडाने ठेचून मारल्याचा खुलासा

कर्जमाफी फसलेली नाही

जिल्हा बँकेचे २९ हजार खातेदारांपैकी २८ हजार खातेदारांना कर्जमाफीचा फायदा होईल. कुणालाच फायदा होणार नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. बँकेचे कर्ज वाटपही पूर्ण झाले आहेत. ९० टक्के आम्ही कर्ज वाटप केले आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Bachchu kadu has made a major statement regarding the two shiv sena factions coming together

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • Bacchu Kadu
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
2

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
3

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.