Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बच्चू कडू अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; 4 तारखेला करणार गौप्यस्फोट

राज्यामध्ये विधानसभा निवडणूका लागल्या आहेत. त्यामुळे तिसरी आघाडी निर्माण झाली असून बच्चू कडू यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. बच्चू कडू यांनी लवकरच गोप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 18, 2024 | 11:24 AM
bachhu kadu with eknath shinde

bachhu kadu with eknath shinde

Follow Us
Follow Us:

अमरावती : विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. महायुतीसह महाविकास आघाडी उमेदवार आणि जागावाटप याची जोरदार तयारी करत आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी देखील तयारी झाली आहे. यामध्ये बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी यांच्या संघटना सामील झाल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांना देखील तिसऱ्या आघाडीमध्ये सामील होण्यासाठी विनंती केली जात आहे. दरम्यान, बच्चू कडू आणि शिंदे गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याचे देखील बोलले जाते. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधतात. यावेळी त्यांनी गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले. बच्चू कडू म्हणाले की, “महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही जनता कंटाळली आहे. दोन्ही युती-आघाडीत जागावाटपामध्ये तिढा आहे. भाजप आणि काँग्रेस एकच आहेत. अर्थकारणात काही बदल झालेला नाही. आम्ही मुद्द्यावर लोकांना घेऊन जाऊ. चार तारखेला पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट होईल. 4 नोव्हेंबरला स्पष्ट  होईल, महाशक्ती हा स्फोट करणार आहे,” असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

हे देखील वाचा : राष्ट्रवादीमध्ये चाललंय तरी काय? अजित पवारांच्या उमेदवाराला शरद पवारांचा पाठिंबा?

पुढे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेत बच्चू कडू म्हणाले की, “चांगले उमेदवार आणि चांगले मतदार संघ आमच्याकडे आलेले दिसणार आहेत. युती आणि आघाडी या दोघांना पहिले पाडायचे आहे. जरांगे पाटील यांच्या संबंधात माझे काही बोलणे झाले नाही. उमेदवारांच्या ताकदीपेक्षा राजकारण महत्त्वाचे आहे. 4 नोव्हेंबरला सगळं स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट पाहायला मिळणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच पिक्चर क्लिअर होईल. माझ्या मतदारसंघातील लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी तिथूनच लढणार,” असे म्हणत बच्चू कडूंनी विधानसभेमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Bachu kadu of prahar organization will make a political secret explosion on october 4

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 11:24 AM

Topics:  

  • Bacchu Kadu
  • Eknath Shinde
  • Vidhansabha Elections 2024

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
2

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
3

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.