पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (फोटो- टीम नवराष्ट्र)
पंढरपूर: पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील विठ्ठला बालाजीचे प्रतिरुप मानले जाते. त्यामुळे बालाजी दर्शनानंतर अनेक भाविक विठ्ठल दर्शनासाठी हमखास पंढरपूरला येतात. अयोध्येतील राम मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवल्याची घटना ताजी असतानाच आता पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातून बालाजीचे मंदिर हटवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून हे काम रडतखडत सुरु आहे. मंदिराचे काम संथगतीने सुरु असल्याची भाविकांची ओरड असतानाच मंदिरातील बाजीराव पडसाळी समोरील बालाजीचे पुरातन दगडी मंदिर हटवण्यात आल्याने भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.