फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, वैभव आणि आरामाचे प्रतीक मानला जातो. हा ग्रह जीवनात प्रणय, संपत्ती आणि सर्जनशीलतेवर आपला प्रभाव पाडतो. यावेळी शुक्र देव गुरुवार, 21 ऑगस्ट रोजी पहाटे 1.25 वाजता कर्क राशीत प्रवेश केला आहे. कर्क राशीमध्ये तो 21 सप्टेंबरपर्यंत म्हणजे पूर्ण एक महिना राहणार आहे. कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. मात्र या संक्रमणाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. या काळात काही राशीच्या लोकांना विशेष फायदा होईल. तर काही राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे.
कर्क राशीमध्ये शुक्राचे होणारे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. हे संक्रमण मिथुन राशीच्या कुंडलीमध्ये दुसऱ्या भावावर परिणाम करेल. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक समृद्धी आणि सामाजिक संबंधांमध्ये गोडवा आणेल. तुमच्या बोलण्यात आकर्षण वाढेल, ज्यामुळे लोक तुमच्या शब्दांनी प्रभावित होतील. यावेळी तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे, उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात किंवा अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ अनुकूल असेल. नोकरी करणाऱ्या लोकांना सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल आणि पदोन्नती देखील मिळू शकते.
शुक्राचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. कर्क राशीतील शुक्राचे संक्रमण तुमच्या पहिल्या भावावर परिणाम करेल. याचा संबंध व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि आरोग्यावर परिणाम करणारे असू शकते. या काळात तुमचे आकर्षण आणि आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होतील. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन संधी मिळून शकतात, उत्पन्नाचे स्त्रोत तयार होतील. आर्थिक स्थिती सुधारु शकते. या काळामध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. तसेच करिअरमध्ये तुम्ही प्रगती करु शकता. मात्र या काळात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मकर राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण फायदेशीर राहील. हे संक्रमण सातव्या भावावर परिणाम करेल. या संक्रमणाचा संबंध जोडीदार, भागीदारी आणि सामाजिकतेशी संबंधित आहे. या काळात वैवाहिक जीवनात आणि व्यावसायिक भागीदारीत सकारात्मक होतील. यावेळी तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. जे लोक भागीदारीत काम करत आहेत अशा लोकांना अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांना मान सन्मान मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)