Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक अर्थशास्त्रज्ञाला आपण मुकलो; मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला शोक

डॉ. मनमोहन सिंग यांना जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 27, 2024 | 01:07 PM
जागतिक अर्थशास्त्रज्ञाला आपण मुकलो; मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला शोक

जागतिक अर्थशास्त्रज्ञाला आपण मुकलो; मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला शोक

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल (दि.26) निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जागतिक पातळीवर अर्थतज्ज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले डॉ. मनमोहन सिंग हे 92 वर्षांचे होते. देशाचे पहिले शीख पंतप्रधान म्हणून काम केलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राज्यातील नेत्यांनी देखील डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. थोरात यांनी लिहिले आहे की, देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. जगाशी स्पर्धा करणारा मजबूत भारत घडविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. एका जागतिक अर्थशास्त्रज्ञाला आपण मुकलो आहोत. सन 1991 मध्ये पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मनमोहन सिंग यांना प्रथमताच अर्थ खात्याची जबाबदारी मिळाली. याच काळात आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून त्यांनी अर्थव्यवस्थेची दिशा बदलून दाखविली. आज जो सामर्थ्यशाली भारत निर्माण झाला आहे त्यामध्ये मनमोहन सिंग यांनी केलेल्या आर्थिक सुधारणांचा मोठा वाटा आहे. असं थोरात म्हणाले.

पुढे थोरात यांनी लिहिले की, पंतप्रधान म्हणून सामाजिक आणि आर्थिक सुधारणांवर त्यांनी भर दिला. सामान्य माणसांच्या हक्कांचे रक्षण करून, त्यांचा आवाज बुलंद केला. सन 2008 मध्ये राष्ट्रव्यापी शेतकरी कर्ज माफी जाहीर करून त्यांनी देशातील शेतकऱ्यांना धीर दिला. याशिवाय राष्ट्रीय रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार, प्रत्येक भारतीय नागरिकाचे ओळखपत्र अर्थात आधार, लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात लाभ मिळवून देणे, अन्नसुरक्षा कायदा यासारखे धाडसी निर्णय त्यांनी केले. राजकीय हेतूने मनमोहन सिंग यांच्यावर टीका झाली असली, तरीही इतिहास मात्र त्यांची नोंद अत्यंत सकारात्मक घेईल. एक सामर्थ्यशाली देश घडविणाऱ्या कणखर आणि खंबीर नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.

हे सुद्धा वाचा : यशस्वी पंतप्रधान, भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड; नाना पटोले यांच्या भावना

पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराचा प्रोटोकॉल

देशाच्या माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी राज्य प्रोटोकॉलचे पालन केले जाते. यामध्ये त्यांनी देशासाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या पदाचा गौरव करण्यात आला आहे. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी माजी पंतप्रधानांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळले जाते. अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना 21 तोफांची सलामी दिली जाईल. माजी पंतप्रधानांच्या शेवटच्या दौऱ्यात सुरक्षा आणि प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाते. याशिवाय लष्करी बँड आणि सशस्त्र दलाचे जवानही शेवटच्या प्रवासात सहभागी होतात. यादरम्यान ते पारंपरिक पदयात्रा काढतात.

Web Title: Balasaheb thorat has reacted after the death of former prime minister manmohan singh nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 01:07 PM

Topics:  

  • Congress
  • Manmohan singh
  • prime minister

संबंधित बातम्या

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण
1

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण

निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, सर्वच पक्षांनी…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन
2

निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, सर्वच पक्षांनी…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात
3

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Palghar Mob Lynching Case:पालघर साधु हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा भाजप प्रवेश; विरोधकांच्या आरोपानंतर प्रक्षप्रवेशाला स्थगिती
4

Palghar Mob Lynching Case:पालघर साधु हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा भाजप प्रवेश; विरोधकांच्या आरोपानंतर प्रक्षप्रवेशाला स्थगिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.