Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऊस बिलातून कर्जवसुली थांबवा, अन्यथा…; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा

ऊस बिलातून बँकांकडून सुरू असलेली कर्जवसुली तत्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 14, 2025 | 01:18 PM
ऊस बिलातून कर्जवसुली थांबवा, अन्यथा...; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा

ऊस बिलातून कर्जवसुली थांबवा, अन्यथा...; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:
  • शेतकरी मोठ्या संकटात
  • ऊस बिलातून कर्जवसुली थांबवा
  • बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा
कराड : राज्य सरकारने ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी जाहीर केली असताना शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून बँकांकडून सुरू असलेली कर्जवसुली तत्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. वसुलीमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीस अपात्र ठरण्याचा गंभीर धोका निर्माण झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे की, सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. एकीकडे पूर्ण कर्जमाफीची घोषणा केली असताना दुसरीकडे जिल्हा व सरकारी बँकांकडून वसुली सुरू आहे. ३० मार्च २०२६ रोजी थकबाकी असलेल्यांनाच कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. परंतु, जून २०२६ पूर्वीच कर्जवसुली झाली, तर तो शेतकरी थकबाकीदार राहणार नाही आणि सरळ सरळ कर्जमाफीपासून वंचित राहील.

सरकारचे नियंत्रण नाही

सध्या राज्यभर साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू असून, ऊस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या बिलातून बँका थेट कर्ज कपात करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या वसुलीवर सरकारचे नियंत्रण नाही. जाणीवपूर्वक मुदत वाढवून सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

शेतकरी मोठ्या संकटात

अतिवृष्टी, पिकांचे प्रचंड नुकसान, उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी मोठ्या संकटात असल्याचे सांगून, पाटील यांनी शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे योग्य दर देण्याची मागणी केली. ऊस बिलातून होणारी कर्जवसुली हा शेतकऱ्यांवरील अन्याय असून, सरकार त्यास जबाबदार आहे. तत्काळ कर्जवसुली थांबवून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा खरा लाभ द्यावा. अन्यथा, बळीराजा शेतकरी संघटना तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Baliraja farmers association has demanded a halt to debt collection from sugarcane bills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Sugarcane Bill

संबंधित बातम्या

जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! ​एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?
1

जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! ​एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?

मावळ हादरलं! 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या; आरोपीला ठोकल्या बेड्या
2

मावळ हादरलं! 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या; आरोपीला ठोकल्या बेड्या

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचा खर्च; मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना भेटणार
3

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचा खर्च; मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना भेटणार

पुण्यात पोलीस अधिकाऱ्याने थांबवलं इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; नेमकं काय घडलं?
4

पुण्यात पोलीस अधिकाऱ्याने थांबवलं इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.