Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उदय धातुंडे होणार इचलकरंजीचे पहिले महापौर, तर उपमहापौर…; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उदय धातुंडे तर उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 06, 2026 | 02:31 PM
उदय धातुंडे होणार इचलकरंजीचे पहिले महापौर, तर उपमहापौर...; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

उदय धातुंडे होणार इचलकरंजीचे पहिले महापौर, तर उपमहापौर...; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Follow Us
Follow Us:
  • उदय धातुंडे होणार इचलकरंजीचे पहिले महापौर
  • उपमहापौरपदासाठी अनिल डाळ्या यांचं नाव निश्चित
  • चंद्रकांत पाटील यांची घोषणा
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उदय धातुंडे तर उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. दहा महिन्याऐवजी हे पद सव्वा वर्षाचे राहणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचलेल्या चर्चेला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेनंतर पूर्णविराम मिळाला आहे.

 

दरम्यान, बैठकीनंतर महापौरपदासाठी उदय धातुंडे आणि उपमहापौरपदासाठी अनिल डाळ्या यांनी आपापले अर्ज महानगर पालिकेत दाखल केले. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत ६५ पैकी ४७ जागा जिंकून भाजप महायुतीने सत्तासूत्रे आपल्या हाती ठेवण्यात यश मिळविले. त्यामध्ये सर्वाधिक ४३ जागा जिंकल्यामुळे भाजपचाच महापौर होणार हे निश्चित झाले होते. त्यातच महापौरपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी आरक्षित झाल्याने तब्बल २७ इच्छुकांमधून संधी कोणाला मिळणार याची उत्सुकता वाढली होती.

महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत ६ फेब्रुवारी असल्याने दोन दिवसांपासून पहिला महापौर कोण? या चर्चेला पुन्हा उधाण आले होते. तर सोशल मिडीयावर महापौरपदी उदय धातुंडे आणि उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची निवड झाल्याचे संदेश व्हायरल झाले होते. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक झाली. यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, गटनेता विठ्ठल चोपडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, स्वप्निल आवाडे शशिकांत मोहिते यांच्या उपस्थितीत पाटील यांनी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीची घोषणा केली. ते म्हणाले,

इच्छुकांची संख्या मोठी असली तरी भाजपच्या शिस्तीनुसार स्थानिक नेतेमंडळींसोबत झालेल्या चर्चेतून महापौर आणि उपमहापौर पदासाठी इच्छुक प्रत्येकी पाच सदस्यांची नावे प्रदेश समितीकडे पाठविण्यात आली होती. त्यामधून महापौरसाठी उदय धातुंडे आणि उपमहापौरसाठी अनिल डाळ्या यांच्या नांवावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगत घोषणा केली.

महापौर, उपमहापौर हे सव्वा वर्षांचेच

नियमानुसार महापौर पद हे अडीच वर्षांसाठीच असते. पण स्थानिक पातळीवर सर्वांना संधी देण्याच्या उद्देशाने त्यासाठी ठराविक कालावधी ठरविला जातो. पण या संदर्भात महत्वाच्या पदावरील व्यक्तीला कामकाज पध्दती समजण्यासह काम करण्याची संधी मिळावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने इचलकरंजी महानगरपालिका महापौरपद हे सव्वा वर्षांसाठीच असणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे महापौर व उपमहापौर हे सव्वा वर्षासाठी कार्यरत राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा : मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नका, नाहीतर…; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

निवडणूक बिनविरोधसाठी आवाहन

चंद्रकांत पाटील यांनी, महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक विरोधकांनी बिनविरोध होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. कोल्हापूर आणि पुणे महानगरपालिकेचे प्रभारी आमदार सतेज पाटील यांना मी आवाहन केले आहे. त्याच पद्धतीने विरोधी आघाडीतील मदन कारंडे यांनी यासाठी एक पाऊल पुढे टाकावे. शहराच्या पाच वर्षाच्या विकासासाठी सत्तारुढ आणि विरोधी गट मिळून काम करुन एक वेगळा आदर्श निर्माण करुया, असे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Bjp leader chandrakant patil has made a big announcement regarding the post of ichalkaranji mayor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Ichalkaranji
  • Ichalkaranji News

संबंधित बातम्या

‘लालपरी’ची ज्ञानयात्रा, लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना एसटीचे सुरक्षित पंख! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
1

‘लालपरी’ची ज्ञानयात्रा, लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना एसटीचे सुरक्षित पंख! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

पोह्यात आळी अन् भातात सापडले झुरळ, अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; कँटीन परवाना केला निलंबित
2

पोह्यात आळी अन् भातात सापडले झुरळ, अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; कँटीन परवाना केला निलंबित

पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 28 हेक्टर जागेमध्ये ‘आयआयएम’; राज्याच्या महसूल व वन विभागाकडून अध्यादेश जारी
3

पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 28 हेक्टर जागेमध्ये ‘आयआयएम’; राज्याच्या महसूल व वन विभागाकडून अध्यादेश जारी

श्रीरामपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; एका रात्रीत दोघांच्या आवळल्या मुसक्या
4

श्रीरामपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; एका रात्रीत दोघांच्या आवळल्या मुसक्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.