Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Politics: विकासाला विरोध नाही, शेती वाचवा; मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर बारामतीत वाद

नागरिकांनी केंद्र सरकार व संबंधित विभागाकडे प्रस्तावित मार्गाची अधिकृत अधिसूचना तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक नागरिक, शेतकरी आणि ग्रामपंचायतींकडून हरकती व सूचना मागवून त्यावर सविस्तर सुनावणी घ्यावी.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 05, 2026 | 05:15 PM
दिल्ली ते पाटणा हायस्पीड ट्रेन लवकरच धावणार; 1170 किमीचा प्रवास साडेचार तासांत होणार पूर्ण

दिल्ली ते पाटणा हायस्पीड ट्रेन लवकरच धावणार; 1170 किमीचा प्रवास साडेचार तासांत होणार पूर्ण

Follow Us
Follow Us:
  • बागायती शेती आणि घरांचे नुकसान होण्याची भीती
  • पिढ्यानपिढ्या चालत आलेली सुपीक शेती गमावण्याची टांगती तलवार
  • अधिसूचना प्रसिद्ध करून पारदर्शक सुनावणी घेण्याची मागणी
Baramati Politics: मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्तावित मार्ग बारामती तालुक्यातून जाणार असल्याची बातमी दैनिक नवराष्ट्रमध्ये प्रसिद्ध होताच बारामतीसह परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे बारामतीसह पुणे जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि औद्योगिक तसेच व्यावसायिक गुंतवणुकीला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र प्रस्तावित मार्ग

मात्र, या प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गामुळे बारामती तालुक्यातील बागायती पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ऊस, द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला व इतर नगदी पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या या भागातील शेती उद्ध्वस्त झाल्यास शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Baramati Politics: “विकासाला विरोध नाही, शेती वाचवा!”; मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर बारामतीत वाद

त्यामुळे बुलेट ट्रेनचा मार्ग बागायती भागातून न नेता जिरायती भागातून किंवा कमीत कमी शेतीचे नुकसान होईल अशा पर्यायी मार्गाने निश्चित करण्यात यावा, अशी मागणी नागरिक, शेतकरी आणि विविध सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे. विकासाला कोणाचाही विरोध नसून शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करत विकासाचा समतोल साधला जावा, अशी भूमिका स्थानिकांनी मांडली आहे.

नागरिकांनी केंद्र सरकार व संबंधित विभागाकडे प्रस्तावित मार्गाची अधिकृत अधिसूचना तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक नागरिक, शेतकरी आणि ग्रामपंचायतींकडून हरकती व सूचना मागवून त्यावर सविस्तर सुनावणी घ्यावी. प्राप्त हरकतींचा गांभीर्याने विचार करून आवश्यक ते बदल करत अंतिम मार्ग निश्चित करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Rohit Patil Disqualified: दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे पद रद्द; जात प्रमाणपत्र ठरले अवैध

बारामती परिसरात मोठ्या प्रमाणावर सिंचन व्यवस्था, सहकारी साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय आणि कृषी प्रक्रिया उद्योग उभे आहेत. त्यामुळे या भागातील सुपीक जमिनींचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. अनेक ठिकाणी सरकारी पडीत जमीन, जिरायती क्षेत्र किंवा कमी नुकसान होईल असा पर्यायी मार्ग उपलब्ध असल्यास त्याचा प्राधान्याने विचार करावा, अशीही सूचना करण्यात येत आहे.

दरम्यान, बुलेट ट्रेनसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पाचे स्वागत करतानाच स्थानिकांच्या भावना, पर्यावरणीय परिणाम, सिंचन व्यवस्था आणि शेतकऱ्यांचे दीर्घकालीन हित लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घ्यावा, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. विकास आणि शेतकऱ्यांचे संरक्षण या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणारा मार्ग निश्चित झाल्यास हा प्रकल्प बारामतीसाठी खऱ्या अर्थाने विकासाची नवी दिशा ठरेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

Web Title: Baramati news mumbai hyderabad bullet train proposed route farmers protest demand alternative route

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • baramati
  • Bullet Train
  • pune news

संबंधित बातम्या

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती
1

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
2

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
3

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
4

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.