
Beed Gevrai BJP candidate Geeta Pawar threatening candidates Video viral
Geeta Pawar Viral Video : बीड : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणूका होत आहेत. यासाठी उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन करत आहे. आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. दरम्यान, बीडमधील भाजपमधील एका उमेदवाराची व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या उमेदवार मतदारांना विनंती करत आहेत की धमकी देत आहेत असा प्रश्न पडला आहे.
बीडमधील गेवराई येथील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीता पवार या चर्चेत आल्या आहेत. गीता पवार यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांनी प्रचार करताना उमेदवारांना थेट धमकी दिली. सत्ताधारी पक्षामधील असल्यामुळे योजनांची आठवण करुन मतदारांना थेट तंबी दिल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गीता पवार मतदारांना घरकुल योजनेच्या हप्त्यांचा उल्लेख करत, कमळाला (भाजपचे निवडणूक चिन्ह) मतदान न केल्यास गंभीर परिणामांची धमकी देताना दिसत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप उमेदवार गीता पवार म्हणत आहे की, “जरा जरी खाली वर झालं, माझ्याशी पंगा आहे मग. घरकुल दिलेलंय. एक-एक अशी झोडपीन सोडायची नाही,” असे शब्द त्या वापरत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या गीता पवार या भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजय आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) शीतल दाभाडे यांना उमेदवारी मिळाली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या घटनेमुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी उमेदवारांची आरेवारी समोर आल्यामुळे जोरदार टीका देखील केली जात आहे. मतदारांना धमकावल्याच्या या व्हिडिओबद्दल भाजपच्या उमेदवाराकडून संध्याकाळपर्यंत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
संबंधित व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, आजपर्यंत मत मागण्यासाठी हात जोडणारे उमेदवार बघत आलो… पण आता कमळाला मतदान करण्यासाठी मतदाराला झोडपून काढणारे उमेदवार बघण्याची वेळ आलीय..या आहेत ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणल्या जाणाऱ्या भाजपच्या गेवराई नगराध्यक्षपदाच्या उमेदवार…! कमळाला मत देण्यासाठी त्या मतदारांना कशा धमकावतायेत, तुम्हीच बघा..! असे रोहित पवारांनी लिहिले आहे.
आजपर्यंत मत मागण्यासाठी हात जोडणारे उमेदवार बघत आलो… पण आता कमळाला मतदान करण्यासाठी मतदाराला झोडपून काढणारे उमेदवार बघण्याची वेळ आलीय.. या आहेत ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणल्या जाणाऱ्या भाजपच्या गेवराई नगराध्यक्षपदाच्या उमेदवार…!
कमळाला मत देण्यासाठी त्या मतदारांना कशा… pic.twitter.com/j5vms0Hgxp — Rohit Pawar (@RRPSpeaks) November 20, 2025